Saturday, December 19, 2015

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ४ : वॅलीमधला पहिला दिवस

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे इंग्रजांनी दिलेले नाव आहे. भारतात अजिंठा, लोणार, हि व्हॅली अशा गोष्टींची महती लोकांना कळायला इंग्रज लोकच का लागतात काय कि? विसाव्या शतकात 1931 मध्ये काही इंग्रज गिर्यारोहक चुकून इथे आले आणि त्यांना या सुंदर जागेचा शोध लागला. त्यापैकी एकाने “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” याच नावाने पुस्तक लिहिले आणि या नावाने हि जागा प्रसिद्ध झाली.


इंद्राची बाग असाही कुठे तरी उल्लेख वाचला मी. दर वर्षी इथे हिवाळ्यात पूर्ण बर्फ साचतो. हि व्हॅली, घांगरिया, हेमकुंड सर्व बर्फाच्छादित असतं. उन्हाळ्यात तो वितळतो, आणि मगच या ठिकाणी जाता येतं.


हि जागा संरक्षित आहे आणि जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. तेथे फक्त दिवसा फिरता येते आणि मुक्काम करता येत नाही. मुक्कामाला त्यामुळेच घांगरियालाच यावे लागते.


दुपारनंतर पार्क बंद होतो म्हणून जास्त वेळ तिथे घालवायचा असेल तर जितक्या लवकर जाता येईल तितकं चांगलं.


आमचा तो प्रयत्न असला तरी सगळ्यांचं आवरून खाऊन निघेपर्यंत कालसारखा पुन्हा उशीर झाला.


घांगरियापासून व्हॅली 6 किमी अंतरावर आहे. सुरुवातीला प्रशस्त असणारी पायवाट तिथे पोचेपर्यंत चिंचोळी होत जाते. पार्कच्या सुरुवातीला एक परमिट काढावे लागते. ते तीन दिवस वैध असते.





रस्त्यात बरिच चढण आहे आणि दोन तीन धबधबे आणि छोटे प्रवाह पार करून जावं लागत. घांगरिया गाव, तो रस्ता, हिमालयाची शिखरे, सर्व काही अति सुंदर आहे.

ती व्हॅली आणि तिथे जाण्याचा प्रवास सर्वच अप्रतिम अविस्मरणीय. मांझीच्या भाषेत शानदार झबरदस्त झिंदाबाद.



कालसारखा थांबुन गतीभंग होऊ नये म्हणुन मी फार न थांबता पुढे चाललो होतो. त्यामुळे मी एकटाच पुन्हा पुढे होतो. बाकीजण थांबत फोटो काढत येत होते. बाकी ग्रुपमध्ये अंगदकडे प्रोफेशनल कामेरा होता, हरप्रीतकडेसुद्धा सुपरझुम होता. बाकी सर्व जणांकडे आयफोनसारखे भारी फोन होतेच. सर्व आपला फोटोग्राफीचा शौक पुरा करत होते.

एस.एल.आर कॅमेरा गळ्यातच अडकवून चढाईवर जाणे म्हणजे कसरत आहे. माझ्यात थोडं उन असल्यामुळे तेवढा उत्साह नव्हता. काही वेळ मी फोटो न काढताच चाललो होतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याला तिथलं प्रत्येक पाउल, प्रत्येक व्ह्यु इतका सुंदर वाटतो कि किती म्हणुन फोटो काढणार?

तरी आता डिजिटल क्रांतीमुळे मोबाईल, डिजिटल कॅमेरा वापरून फोटो काढणे, आठवणी जतन करणे इतके सोपे झाले आहे. आणि महत्वाचे म्हणजे स्वस्त झाले आहे. प्रत्येक जण खचाखच क्लिकक्लिकाट करून ढीगभर फोटो काढू शकतो. रोलच्या जमान्यात प्रत्येक फोटो किती विचारपूर्वक काढावा लागायचा.


वॅलीच्या जवळ पोचल्याची चिन्हे दिसत होती. मग मी मोबाईल काढला आणि हिमालयाच्या पार्श्वभूमीवर माझा सेल्फी काढून फोटो काढणे पुन्हा सुरु झाले. तो सेल्फी पुढे बरेच दिवस माझा डीपी होता. तिथून पुढे मग मी जरा निवांत मोबाईलवरच फोटो काढत फिरलो.

उन सुद्धा कमी झालं, थोडा दिलासा मिळाला. पण लगेच आभाळ अगदी गडद झालं आणि मग जरा भीती वाटली. पाऊस पडेल असंही वाटत होतं आणि धुकंसुद्धा दाटून येत होतं. त्या भागात धुकं दाटून सगळं काही दिसेनासं व्हायला वेळ लागत नाही. आणि पुन्हा उन पडून सगळं स्वच्छ व्हायलासुद्धा वेळ लागत नाही. पण या दोन्हीमध्ये किती वेळ जाईल ते सांगता येत नाही. दुपारपर्यंत हे टिकलं असतं तर आजचा दिवस बराच अंशी वायाच. कारण दुपारनंतर तिकडून परतीला निघावेच लागते.

वॅली अगदी जवळ आली आणि तिथे छान पक्षी दिसु लागले. माझा कॅमेरा आता वर काढणे भागच होते. त्यांचे फोटो घेण्याचे निष्फळ प्रयत्न करून झाले. फारच चपळ आणि चंचल पक्षी होते.




मग एक जलप्रवाह पार करायला कामचलाऊ लाकडं आणि पत्रा टाकला होता. तो पार करून आम्ही अधिकृतरित्या वॅलीमध्ये दाखल झालो. आणि समोरचा नजारा पाहून एकदम उल्हसित (पागल) झालो. हिमालयाच्या रांगा, भरपूर हिरवळ, आणि भरपूर फुलं.








दिसेल त्या प्रत्येक फुलाचा फोटो काढणं सुरु झालं. आमचे मॅनेजर जे होते देवकांत संगवान. ते स्वतः आधी काही वर्षांपूर्वी फिरत फिरत इथे आले आणि या जागेच्या प्रेमात पडले. मग पुन्हा पुन्हा आले, आणि हा व्यवसायच सुरु केला. (हेवा वाटतो अशा लोकांचा) ते वॅली आणि हेमकुंड प्रवाशांसाठी खुले असतानाचे वर्षातले ४ महिने गोविंदघाटला येउन राहतात. आणि एक एक आठवडा भरपूर ग्रुप्सला घेऊन फिरतात.




इतकी वर्षे आल्यामुळे त्यांच्याकडे इथल्या जवळपास सगळ्याच फुल पक्षी प्राण्यांच्या फोटो आणि व्हिडीओचा संग्रह आहे. एका भेटीमध्ये सर्वकाही दिसणे शक्य नाही. त्यांनी एक फोटोबुक छापले आहे या फोटोंचे. आम्हाला सगळ्यांना एक एक प्रत दिली होती. आम्ही ती काढुन समोर दिसणाऱ्या फुलाचे नाव शोधत होतो.

पण हा उत्साह खूप टिकत नाही. आपल्याला वैज्ञानिक नाव आणि माहिती जाणून तरी काय करायचं असतं? तेव्हा काही पाठ झालेली नावं आता इथे आल्यावर पुन्हा विस्मरणात गेली. त्या रात्री आम्ही घांगरीया गावात एका छोटेखानी दालनात प्रोजेक्टरवर एक माहितीपट पाहिला. त्यात फुल आणि वनस्पतींची शास्त्रीय माहिती  जरा जास्तच होती. तो पाहता पाहता अंधारात सगळेच झोपले होते. आणि आपण सोडून बाकी लोक सुद्धा झोपले होते हे आम्हाला बाहेर आल्यावर कळलं. शेवटी आपल्याला (म्हणजे आम आदमीला) भावतं आणि लक्षात राहतं ते सौंदर्य.





थोड्या अंतराने तीच तीच फुले असली तरीसुद्धा न थांबता फोटो सुरु होते. कारण प्रत्येक ठिकाणी फुलांचं कॉम्बिनेशन वेगळं होतं. आणि मग ज्याची भीती होती तेच झाले. पाउस सुरु झाला. खूप जोरात नसला तरी कॅमेरा आत ठेवणे भाग होते. मग पुन्हा मोबाईल (पिशवीत गुंडाळुन) फोटो काढणे सुरु.



बरीच गर्दी वाटली त्या दिवशी. आम्ही बरेच पुढे गेलो. पाऊस न थांबता चालू होता. काही जण येताना भेटले. ते म्हणाले आम्ही खूप लवकर आलो इथे, त्यांना पूर्ण उन्हात, बिना पावसात फिरता आलं. आम्हाला उशीर झाला म्हणून मनात जर चरफड झाली.

हिमालयन ऑर्किड
पुढे एका ओढ्याच्या अलीकडे सगळे थांबले होते. तिथे देवकांत एक दुर्मिळ असलेले फुल "हिमालयन ऑर्किड" सगळ्यांना दाखवत होते. पायाखाली काही चिरडू नका म्हणून सगळ्यांना डाफरत होते. ते पाहून झाल्यावर आम्ही परत फिरलो. पुढे पावसामुळे पाणी वाढले होते. आणि पहिल्या दिवशी लोक इथपर्यंतच जातात म्हणून सांगितले.

देवकांत यांनी आम्हाला सांगितले होते कि बाकी सगळे ऑपरेटर एकच दिवस वॅलीमध्ये नेतात. आणि इथपर्यंतच नेतात. मी दुसऱ्या दिवशीसुद्धा नेतो. आणि यापेक्षा बरंच पुढे. तिकडे कोणी नेत नाही. आणि खरंच जेव्हा आम्ही नंतर त्यापुढे बरंच अंतर गेलो, तेव्हा कोणीही तिकडे नव्हतं. फक्त आमचा ग्रुप.

मग परत आलो. पाउस आणि वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. वॅलीच्या सुरुवातीला एक मोठ्ठी शिळा आहे. तिथे बसायला खडकावर बरीच जागा आहे. तिथेच सगळे जेवत होते. आम्हीपण तिथे जेवायला बसलो. थंडीमुळे पुरीभाजी आणलेली होती, ती एकदम कडक झाली होती. ती खायला जरा कठीण झाली होती. कसंबसं ते संपवलं. आणि परत निघालो. परतीचा प्रवास नेहमीच निवांत आणि मजेत होतो. लवकर लवकर चढुन जाण्याची घाई नसते.

येताना सुदैवाने मला पक्ष्यांचे थोडे फोटो मोठ्या मुश्किलीने घेत आले. एक लाल रंगाचा चिमणी सारखा पक्षी, तितकाच चपळ, सतत इकडून तिकडे उडत होता. लेन्स बदलून फोटो काढायचा प्रयत्न करत होतो, पण बरेच फोटो काढूनही स्थिर आले नाहीत. शेवटी एका जागी बसला, ती लेन्स च्या आवाक्या बाहेरची होती, तरी फोटो काढला. झूम केलेली प्रत इथे टाकली आहे.



आणि एक स्थानिक जातीचे कबुतर. हि जोडी रस्त्या पासून बरीच बाजूला एका झाडावर शांत बसली होती. पण दोघांचा चांगला व्ह्यू मिळत नव्हता. होईल तितके जवळ जाऊन फोटो काढण्याच्या नादात माझे पाय (बूट) शेणात बरबटले. ते साफ करण्याचा एक वेगळा उद्योग करावा लागला.



घांगरीयाला रूमवर आम्लेट, भजे मागवुन त्याच्या सोबतीने गप्पा झाल्या. तिथे असेपर्यंत रोज संध्याकाळी ट्रेक संपल्यावर आम्ही हेच करायचो.

घांगरीया गावात फोनची खूप समस्या आहे. खाली गोविंदघाटला आम्ही नेलेल्या बी.एस.एन.एल कार्डवर फक्त फोन येऊ शकत होते. जात नव्हते. मेसेज जात होते. पण इथे वर आल्यावर मात्र आमचे सगळे फोन बंद पडले. इथे फक्त बी.एस.एन.एल आणि आयडिया चालतं म्हणतात. पण तेही बहुधा उत्तराखंडचेच. आमचे फोन काही चालले नाहीत.

त्यामुळे इथे बाकी गोष्टींचे भाव ठीकठाक असले तरी फोन करणे मात्र एकदम महाग. आयडियाचे वायरलेस लॅंडलाइन फोन वापरून इथे पीसीओ उघडले होते. १० रुपये एका मिनिटाला असा किती तरी पट भाव होता. आणि ते प्रीपेड फोन असल्यामुळे किती पैसे कटले ते दिसायचे आणि राग यायचा. कि आपण काही पैशांच्या कॉलला २०-३० रुपये मोजतोय. पण हे ४ महिने हाच त्या लोकांचा धंद्याचा टाईम. आणि रोज बोलून जरा ओळख झाल्यावर ते लोक थोडी सवलतसुद्धा देत होते.

जेवण झालं. देवकांत विचारत होते कि आता तुमच्यापैकी कोण कोण उद्या पुन्हा वॅली मध्ये येणार? त्यांचं असं विचारण्याचं कारण म्हणजे त्यांनी प्लानमध्ये दोन दिवस वॅलीमध्ये ठेवले होते. एक दिवस असा पाउसपाण्यामुळे जादा असावा हा एक हेतू. आणि जास्त फिरण्यासाठी सुद्धा. पण बऱ्याच लोकांना पहिल्या दिवशी जाऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी त्राण राहायचं नाही. आम्ही जाणारच म्हणुन सांगितलं.

रूमवर आलो, पुन्हा गप्पागोष्टी करून, भरपूर टीपी करून, आणि उद्या लवकर जायचंच अशी एकमेकांना तंबी देऊन आम्ही झोपलो.

Thursday, November 26, 2015

(In)Tolerance

Modi government, intolerance, secular fabric, bans... these are the current topics that everybody is discussing on, and coming up with their opinions. Here I am with mine own.

Who I am? "An Indian" is the answer most of you wouldn't be satisfied with. You would want to know my religion. Because a part of this debate is also on religious groups. 

I am a Hindu. Now at least half of you would stop reading here, taking my stand for granted. 

Are you still reading? Thanks. I might make some sense, so please read till the end.

I don't want to mix issues, so let me express my opinion on each separately.

Beef ban/Meat Ban :

Hindu people consider cows as holy. Why? To explain that I may have to write another detailed post. In short, and all myths apart (like cow hosts 33 crore deities in it's body) Hindu culture celebrates and worships almost every aspect of nature and life. Anything that gives us something useful, and benefits us, we worship it. And that's how we have so many gods.

So a lot of Hindus don't like the idea of beef. But there are also Hindus who don't mind if others eat it, and some eat beef themselves. So this beef ban is not supported by each and every Hindu. I don't mind if someone eats beef. It's individual choice everybody has got. I don't support this beef ban, and I can assure you there are many more Hindus like me. So I am against government on this part.

Now about the meat ban in Mumbai that was widely discussed and criticized. "Paryushan Parv" is an important festive occasion of Jain community, which is known for it's belief in non violent philosophy and pure vegetarian food. The ban on meat for some days during this time was there since years, even in the time of Congress lead government. 

Again I am against imposing things and forcing people to do or not do some things which should not be a concern for anybody else. But this issue was brought up in limelight only now and linked to BJP government. Wouldn't you get suspicious by the timing of this discussion?

Dadri Incident : 

Some Hindu people suspected that a Muslim family is having beef. On this mere suspicion they got violent, entered their house, and killed him. 

What reaction do you expect? Any man with his sanity intact would condemn this incident. It does not matter which religion he belongs to. This is against basic humanity.

Intolerance :



But to say that Hindus (in general) have become intolerant is stretching this a little too far. It is the same community that has been known for tolerance for centuries. Hinduism is not a very structured and organized faith. It has a mixture of many cultures, learning from every community that existed in India, settled in India, or tried to invade India.

A lot of kings and emperors tried to invade and loot India. People from other religions came with a "mission" and tried to convert people here by all means possible. How many such Hindu missions are you aware of?

"Ghar Wapsi" (literally meaning to return home, in this event, Hindus who have converted to other faiths, were asked to convert again to be Hindu) was criticized a lot. I am not aware of all the facts of how this thing was executed, so if it was forcefully done, or any unethical thing was done, I condemn the execution.

But what about the concept? Missions of other faiths are sponsored by their central bodies. It is ok for others to convert people in other religion. But it is not ok if people are converted to Hinduism? Why so?

If you want to criticize the manner in which people are lured into conversion, then you should criticize that specifically. But bias against conversion of one religion is not acceptable.

There are lot of terrorist organizations who claim to be fighting for Islam, they call it Jihad. So when these attack people all over the world, and people look suspiciously towards all Muslim people, it is said that terror has no religion. 

Good human beings in Islam, condemn these activities, they say that Islam does not teach this, and these terrorists are not true Muslims. 

Same logic applies here. Those people in Dadri do not define Hinduism, do not represent the Hindu community. They chose the wrong path, and we ask for strict action against them.

Creative Freedom / Free Speech / Freedom of expression :

Creative people are claiming that they don't have creative freedom in this country. Random people oppose them and threaten them. 

Yes. Incidents like this have happened, and keep happening. It is wrong. But it is not completely stoppable. They keep happening all across the world.

Movies like Da Vinci Code, The last temptation of Christ were opposed by christian community everywhere.

A french magazine was attacked twice for publishing cartoons related to Prophet Muhammad. A R Rahman had to face a fatwah for working in a project related to Prophet Muhammad.

The point is no religious community takes slights against it's faith casually.

So what happenes in India if someone says something against Hinduism?

A famous painter M F Husain paints Hindu gods as naked, and in combinations or positions which are not described in any mythological book. Does creative freedom mean the freedom to insult gods and beliefs of another religion? M F Husain faced criticism and opposition and leaved this country. And many Hindus were sad with his departure.

Had he drawn something like that about Islam, what would happen? Above examples are sufficient to explain that.

A film "PK" starring Aamir Khan released, which spoke about strange practices in mainly Hinduism, and other religions for token. A lot of people criticized it, but a lot also liked it (including me), and it was a super hit. I don't mind introspecting our way of life and denying a scope improvement if there is any.

As Aamir Khan rightly said in his controversial interview, to protest is our right and we should exercise it in a non violent manner. So I am against any violent act of protest.

Every individual and community have right to protest, but law should be respected as well. The violent attacks I mentioned above, and murders of people like Dabholkar, Pansare are to be condemned.

But when such incidents are happening world wide, to single out a community and call it intolerant is not good. Misled individuals do this, and they do not represent common man.

I am not justifying any violence, but that is a world we are forced to live in.

Returning Awards :

Awards are given to recognize and honor exemplary work done in some field, during that year. The winner is chosen from other competing individuals with equally respectable body of work.

You can return the trophy and the award amount, but how can you return the honor? How can you return the recognition of being that award winner?

When you return award that you accepted before, can it be given to somebody else who performed well that year? Does it matter now?

I understand that it is your gesture. And I appreciate that it is a non violent (physically) way to protest. But I don't see a point. What I only see is it when you use it as a weapon to throw at someone, it shames the government, insults people among whom you were chosen, and the nation.

What I Want? : 

I am concerned that this debate itself is causing much more religious tension than there actually is in this country. It is blown out of proportion. People are emphasizing on last 7-8 months when they speak of intolerance. 

That's what I don't understand. If serial bomb blasts can't scare people at this level, if mass killing in 26/11 can't scare people this much, if continuous violations by Pakistan can't scare people this much, how can few incidents on smaller scale compared to these can scare people for months?

There were and will always be some foolish leaders, who make silly statements. They exist in all political parties. We can do best to ignore them.

I love my country which has hosted all the faiths in world, where people from all parts and faiths of world have come, settled and prospered. 

I see this issue becoming bigger than it deserves, and affecting all the society. The world is looking at India as a land of rapists, intolerant communal people. Is it really so? Are we all such degraded human beings? We need to decide how far do we want to take this.

I want this to end, and people going back to their business. Because this hyped issue is damaging our reputation and diverting our focus from development to these issues.

I think religion should not be our top national issue. There are many deserving candidates to be on that spot. 

Let's keep religion personal and in our home. That's when we are religious. When we bring it out it is communal. Let's be religious (not compulsory), but let's not be communal.

Tuesday, November 24, 2015

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ३ : ट्रेकची सुरुवात, घांगरीयापर्यंत


गोविंदघाटातून पदयात्रा सुरु करण्याचा दिवस उगवला. स्नेहाने सगळ्यांना उठवण्याची जबाबदारी पार पडली.



रात्री तिथे पोचल्यापासून आम्हाला पाण्याचा खळखळ आवाज ऐकू येत होता. तिथे नदी होती हे तर माहीतच होतं. पण ती नदी आमच्या अगदी समोर होती हा साक्षात्कार आम्हाला पहाटे जरा उजाडल्यावर झाला. कारण आम्ही आलो तेव्हा मिट्ट काळोख होता.

आमचं हॉटेल छोट्या घाटाच्या कडेला होतं. आणि त्याच्यामागे खाली नदी वाहत होती. त्यामुळे तिथल्या रूमची दारे नदीच्याच बाजूने केली होती. नदीचा सुंदर व्ह्यू होता.

आम्ही आवरून भरपेट नाष्टा केला. आमच्याच कंपनीतर्फे अजून दोन ग्रुप चालले होते ते आम्हाला भेटले. एक ग्रुप म्हणजे फक्त एक आजी आजोबांची जोडी. दोघं हि उत्साही आणि काटक. त्यांच्या वयात ते अशा प्रकारच्या ट्रीपला आलेले पाहून आम्हाला कौतुक वाटलं. दुसरा ग्रुप म्हणजे एक खूप मोठं कुटुंब होतं.

ते आजी आजोबा आणि या ग्रुपमधले आजी आजोबा दोघं मस्त मुडमध्ये होते. ब्रेकफास्ट टेबलवर आमच्या आणि त्यांच्या थोड्या गप्पासुद्धा झाल्या.

घांगरीया हे वॅली आणि हेमकुंड या दोन ठिकाणांच्या पायथ्याशी असलेले गाव. गोविंदघाट त्याहुन खाली. आम्हाला वॅली आणि हेमकुंड अशा दोन्ही ठिकाणी जाऊन यायचं होतं. त्यासाठी मुक्काम घांगरीयालाच करावा लागतो. त्यामुळे तिथल्या ३ दिवसासाठीचं  (४ रात्री) सामान वेगळं काढा अशी व्यवस्थापकांची सूचना होती. ते सामान खेचरावर लादून वर नेता येईल, आणि अनावश्यक सामान गोविंदघाटमधेच राहील अशी व्यवस्था होती.

ते वेगळं करून सगळ्यांचं सामान एकत्र करण्यात, सगळ्यांनी आवरून खाली येण्यात, आणि नाश्ता करण्यात असा प्रत्येकात थोडा थोडा वेळ गेला. आणि आम्हाला ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला. आमचे व्यवस्थापक म्हणाले "कल आप फर्स्ट थे आज आप लास्ट हो".

आमचं हॉटेल गोविंदघाटच्या एका टोकाला आणि घांगरीयाचा रस्ता दुसऱ्या टोकाला होता. जिथपर्यंत गाड्या जातात अशा २-३ किमी अंतरापर्यंत आमचं सर्व सामान आणि आम्हाला न्यायला त्यांनी गाड्या दिल्या. त्या ठिकाणापासूनच सामान लादण्यासाठी खेचर/घोडे घेऊन माणसं उभे असतात. आम्ही २ खेचर ठरवले. एका खेचराचे ८०० रु. होतात.



तिथे सगळ्यांसाठी काठ्या विकत घेतात. एरवी चालण्यासाठी फक्त वयोवृद्ध लोक काठ्या वापरतात. पण ट्रेकला जाताना मात्र बरेच लोक काठ्या वापरतात. कारण त्याचा खूप फायदा होतो. चढताना किंवा उतरताना आपला थोडा भार त्यावर टाकून, किंवा फक्त आधाराला म्हणून, आणि कधी फोटो काढताना पोज द्यायला म्हणून.

भारीतली घ्यायची म्हटली तर थोडी लोखंडी, वेगळी मुठ, खाली टोकदार अशासुद्धा स्टिक्स मिळतात. एरवी आपल्या जवळपासच्या किल्ल्यावाल्या ट्रेकला आम्ही जातो तेव्हा ज्याला काठी घेऊन फिरायला आवडतं ते तिथल्या तिथे एखादी वाळकी काठी उचलतो. ती मग वर जाऊन येईपर्यंत सगळ्यांच्या हातात फिरते, तिच्यावर बलप्रयोग होतात. ती खाली येईपर्यंत राहेल कि नाही सांगता येत नाही.

आता ४ दिवस वापरायला हव्या म्हणून आम्ही साध्या पण चांगल्या लाकडी काठ्या प्रत्येकी ३० रु. दराने आणल्या.

इथुन आमचा ट्रेक सुरु झाला. जाता जाता एका आजीकडून हिरवी सफरचंदे घेतली. त्या फ्लेवरचे मी याआधी फक्त एक पेय (सुज्ञांनी ओळखावे :-) ) प्यालो होतो. प्रत्यक्ष ते फळ मी पहिल्यांदाच खाल्ले आणि आवडले.

मधून मधून खायला ज्यातून उर्जा मिळेल, असा सुका मेवा, बिस्किटे, डीहायड्रेशन झाल्यास म्हणून ग्लुकोन डी आणि तत्सम पावडर, चोकलेट अशा गोष्टी सोबत राहू द्या असे आम्हाला सांगितलेले होतेच. ते आम्ही प्रत्येकाने एवढे गांभीर्याने घेतले कि प्रत्येकाच्या सामानात रोज अशा गोष्टी असायच्या. पण त्याचा तितका उपयोग झाला नाही.

वेगळ्या वातावरणात भूक लागत असेल कदाचित, पण आम्ही बहुतांश ढगाळ वातावरणात फिरत होतो. त्यामुळे आम्हाला विशेष भूक लागत नव्हती. रोज आमचे हे पदार्थ बळजबरी खाउनसुद्धा उरत होते. हिमालयात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहते पाणी मिळते आणि पाण्याचा तुटवडा होत नाही.



आमचा शांतपणे, रमतगमत टीपी करत प्रवास चालु होता. हा पूर्ण प्रवास पुष्पावती नदीच्या काठाने आहे. आधी नदीच्या अलीकडच्या बाजूने आणि मग ती नदी पार करून पलीकडच्या बाजूने. बऱ्याच ठिकाणी झाडी असल्यामुळे सावली आहे. रस्त्यात एका ठिकाणी एक २५० मि. उंच आणि मोठा धबधबा लागतो.



सुरुवातीचे २-३ किमी वगळले तर साधारण ११ किमीचा उरलेला प्रवास पायी किंवा हेलीकॉप्टरनेच करावा लागतो. गाडी जात नाही. वर सर्व सामान खेचराकरविच वाहून नेतात. काही जनावरांचे इतके हाल होतात, कि दोनतीनदा आम्हाला थोडी जखम झालेले, रक्त पडत चाललेले जनावर दिसले. पण नाईलाज. त्या लोकांची रोजीरोटी त्यावरच आहे. असेहि वाटते आणि वाईटसुद्धा वाटते.

आम्ही एका ठिकाणी नदीकिनारी बराच टाईमपास केला. मला त्या पाण्यात उतरायची आणि बसायची खूप इच्छा होती. मला एरवीच खूप घाम येतो. तेच थोडा वेळ तीव्र उन लागल्यामुळे भरपूर आलेला होता, त्यामुळे थंडगार पाण्यात उतरून फ्रेश वाटेल असं वाटत होतं.

पण तो प्रवाह इतका जोरदार होता कि भीती पण वाटत होती. मग एक मोठा दगड शोधला ज्यावर पाय पसरून बसता येईल, एका मित्राला बोलवून मला पायाजवळ पकडायला सांगितलं आणि मी आडवा होऊन डोकं आणि होईल तेवढं अंग पाण्यात बुडवलं. मजा आली पण त्या थंडगार पाण्यानी हुडहुडी भरली. :D आमचा गाईड "कहा कहा से आ जाते है" अशा प्रकारचे लुक्स देत होता.

पण मी एकदम ताजातवाना झालो. आणि जोमात पुढे चालायला लागलो. आम्ही १० जण असल्यामुळे प्रत्येकाची स्पीड वेगळी. सहनशक्ती वेगळी. तर आम्ही जवळ जवळ असलो तरी अगदी सोबत फिरत नव्हतो. एक-दोन, दोन-तीन सोबत असे फिरत होतो.

मी आणि निखिल आमच्या ग्रुपमध्ये थोडे मागे मागे राहायचो. बाकीचे पुढे जाऊन थांबायचे आणि आम्ही पोचलो कि पुढे निघायचे. त्यात उन आणि गर्मी हे माझे शत्रू. उन आलं कि प्रचंड घाम येतो आणि शरीरातली शक्ती एकदम गळुन जातो. तर मी पुढे कि मागे हे त्या दिवशीच्या उन्हावर अवलंबुन असायचं.

फोटो काढायला म्हणुन कॅमेरा-लेन्स वगैरे सगळं सोबत घेऊन हिंडत होतो, पण उन आलं कि फोटोग्राफी करायला इच्छा असूनसुद्धा त्राण राहायचं नाही. मग प्राधान्य फक्त अंतर कापत जाण्याला.

तर इथे नदीत डुंबेपर्यंत मी थोडा मागे मागे होतो. पण त्यानंतर मग उत्साहात आणि सुदैवाने थोडी सावली पण लागल्यामुळे बरंच अंतर एकटाच पुढे गेलो. बराच वेळ तर मी माझा ग्रुप सोडून एक पंजाबी ग्रुप जो हेमकुंडच्या तीर्थयात्रेला चालला होता, त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत चाललो होतो.

त्यांना हिंदी नीट येत नव्हती. येत असेल पण ते सारखे हिंदीतून पंजाबीमधेच घसरत होते. त्यातले दोघे तिघे भरभर चालत पुढे गेले. आणि एकजण मागे राहिला जो त्यांच्या ग्रुपमधला माझ्यासारखा होता. :D

तो मला आणि माझ्या मार्गे स्वतःला धीर देत होता. "कोई नई यार, वाहेगुरू दा नाम लेके चलते रहो बस. कभी न कभी पोहोच जाएंगे. क्या जलदी है?" हे तो पुन्हा पुन्हा म्हणायला लागला. आणि त्यानंतर थोडं तत्वज्ञान पण झाडायला लागला. थोडा वेळ ऐकलं आणि मी थांबलो. त्याला म्हटलं ग्रुपसाठी थांबलो आणि पुढे पाठवून दिलं. आणि मी एकटा सापडलो तर परत चिटकेल म्हणून खरंच कोणीतरी येईपर्यंत थांबलो.

मग अमित भेटला तोपण असाच एकटा पुढे आला होता. आम्ही दोघं काही अंतर जाऊन पुन्हा थांबलो. त्याने बेंचवर एक डुलकी मारून घेतली. आम्ही बरेच पुढे आलो असु किंवा मागचे थांबत थांबत, फोटो ब्रेक्स घेत येत होते. बराच वेळ लागला.

असं म्हणतात कि अशा वेळेस चालत राहणे उत्तम. खूप थांबले कि वेळसुद्धा जातो आणि लय तुटते. तेव्हा काहीसं तसंच झालं. तिथे थांबून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा पुन्हा उन आलं आणि माझी पण गती मंदावली. आणि पुढचा प्रवास खूप रेंगाळला.

बाकीजण पुढे गेले. मी,निखिल, अरूप, अनुजा आणि अंशुल थोडे मागे मागे चाललो. जाताना फोटो काढणे, निरीक्षण करणे चालूच होते. एका झाडावर असा फुलांचा गुच्छ दुसला जो दुरून पक्ष्यांचा थवा दिसतो, पण मुळात फुल आहे.





अशाच गोष्टी पाहत पाहत आम्ही ३ च्या दरम्यान पोचलो. आता सगळे थकले होते आणि भूकसुद्धा लागली होती. इथे आमची व्यवस्था येत्या ४ रात्रींसाठी हॉटेल प्रिया मध्ये केलेली होती. त्या दिवशीच्या डिनरपासून ते घांगरीयामधून निघेपर्यंत खाण्याची व्यवस्थासुद्धा कंपनीकडेच होती. आम्ही अशा विचित्र वेळेस जेवण मागवताना पाहून व्यवस्थापक काळजीत पडले. ते म्हणाले आत्ता काही तरी हलकं फुलकं खा, संध्याकाळी जेवण जाणार नाही. आपके पैसे भी जाएंगे मेरे पैसे भी जाएंगे. कोणी त्यांचं ऐकलं नाही आणि दोन्ही वेळेस दाबून खाल्लं.

थोडा वेळ आराम करून आम्ही वॅलीच्या रस्त्यावर एक ग्लेशिअर आहे ते पाहायला गेलो. मोठ्ठा धबधबा, वाहतं पाणी आणि भरपूर बर्फ. बराच वेळ बर्फात खेळण्यात गेला.



तिथे आजूबाजूला असलेली सुंदर फुल झाडे सुद्धा पाहिली.



घांगरीया गावात पोचताना घामेघूम अवस्था, मग थंडी, मग स्वेटर घालून बाहेर पडून चालत गेलो कि पुन्हा गर्मी, आणि बर्फाजवळ गेलो कि पुन्हा थंडी असे वातावरणात अचानक विरुद्ध बदल होत गेल्यामुळे मला स्वतःला थोडा त्रास झाला. बाकी अंगदुखी, डोकेदुखी अशा किरकोळ तक्रारी जवळपास सगळ्यांना होत्या.

रूममध्ये परत आलो आणि गप्पा गोष्टी करून झोपलो. ज्यासाठी इतक्या दूर आलो त्या वॅलीचं दर्शन दुसऱ्या दिवशी होणार होतं.

Saturday, November 14, 2015

कट्यार खरोखर काळजात घुसली

आज "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहिला… त्यापेक्षा जास्त ऐकला. आणि अक्षरशः कान तृप्त झाले.

संगीत नाटक नाट्यगृहात जाऊन बघण्याची इच्छा या न त्या कारणांमुळे अजून अर्धवट होती.

नाही म्हणायला नांदी या कोलाज सदृश नाटकात त्याची चुणूक पाहायला मिळाली. आणि कट्यार हेच नाटक थोडा वेळ टीव्हीवर पाहिले. त्यामुळे ती तहान शमण्याऐवजी अजून वाढली.

आज हा चित्रपट पाहिल्यामुळे तो अनुभव वेगळ्या तऱ्हेने घेता आला. हा चित्रपट घोषित झाला तेव्हा तो कसा बनेल याविषयी शंका होती.

पण सुबोध भावे (यातील नट आणि दिग्दर्शक) यांनी हि जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलून एक नितांत सुंदर चित्रपट आपल्यासमोर सादर केला आहे.

कलावंत, त्यांची कला साधना, कलेवरील प्रेम, त्यांना होणारी ‘ग’ ची बाधा, तुल्यबळ कलाकारांविषयी वाटणारी स्पर्धा आणि मत्सराची भावना यावर अनेक बरेवाईट चित्रपट (सूर, अभिमान, लंडन ड्रीम्स, ई.) आहेत. कट्यार त्या यादीत अग्रस्थानी नक्कीच असेल.



एका राजदरबारी असलेला प्रतिभासंपन्न राजगायक. पंडित भानुशंकर. (शंकर महादेवन) सच्चा कलावंत. त्यांचे विचार आणि संस्कार हे त्यांच्या गायकीइतकेच उच्च असतात.

इतर गायकांना संधी मिळावी आणि मान मिळावा यासाठी आग्रही असणारा हा कलावंत स्वतःचे राजगायकाचे पद पणाला लावून स्पर्धा ठेवतो. या स्पर्धेचं पारितोषिक असते राजगायकाचे पद मान मरातब एक मानाची कट्यार आणि त्या कट्यारीने आत्मसंरक्षणासाठी एका खुनाची माफी.

त्यानेच प्रोत्साहन देऊन त्या गावी आणलेले आपल्या संगीताच्या घराण्याबद्दल अत्यंत अभिमान बाळगणारे खानसाहेब (सचिन) त्या स्पर्धेत उतरतात आणि वारंवार हरतात.

हा आपल्या घराण्याचा अपमान समजून शरमिंदे आणि क्रोधित होतात आणि इथे मत्सरामुळे कलावंताची जागा एक अहंकाराने पछाडलेला माणूस घेतो.

सतत 14 वर्षे हरल्यानंतर खानसाहेब नाट्यमय पद्धतीने जिंकतात आणि यश त्यांच्या डोक्यात जाते.

पंडितजींचा शिष्य सदाशिव (सुबोध भावे) आपल्या गुरूच्या पराभवाचा संगीतानेच बदला घ्यायचे ठरवतो.

त्या सदाशिवाची साधना, त्याने गुरूच्या नकली पुरते मर्यादित न राहता अजून शिकावे खुद्द खानसाहेबांचे शागीर्द व्हावे अशी पंडितजींची ईच्छा, आपल्या घराण्याचा वारसा परक्या माणसाला आणि तेही पंडितजींच्या शिष्याला देण्याला खानसाहेबांचा नकार, त्यानंतर सदाशिवाची धडपड आणि प्रसंगी आततायीपणा आणि त्याची आणि खानसाहेबांची स्पर्धा अशी कथा पुढे जाते.

त्या अनुषंगाने दोन वेगळ्या शैलीतली गाणी, एकाच गाण्याची अनेक रूपे, आणि त्या शैलींचा मिलाफ आपल्याला ऐकायला मिळतो. ती आपल्या कानांना मेजवानीच आहे.

त्यासोबत कलाकारापेक्षा कला मोठी. कलाकार फक्त त्याच्या कलेमुळे नाही तर त्यापलीकडे आपल्या स्वभाव आणि चरित्रामुळे मोठा होतो. कलेला कुठल्याही सीमा नसतात असू नयेत असे अनेक विचार छान प्रकारे समोर येतात.

नाटकाचे किंवा साहित्याचे रूपांतर चित्रपटात करताना ते आणखी मोठ्या स्वरूपात करण्याची संधी आणि स्वातंत्र्य असते. माध्यम आणि तंत्र वेगळे असल्यामुळे आणखी काही बदल आवश्यक असतात. असे दोन्ही प्रकारचे बदल कसे हाताळले जातात यावर त्या चित्रपटाचा दर्जा अवलंबून असतो. अथवा नाटकाची व्हीसीडी आणि चित्रपट यात सेटचाच काय तो फरक राहील.

हा बदल या चित्रपटात सुबोध भावेंच्या चमूने मस्त हाताळला आहे. अतिशय भव्यदिव्य आणि डोळे दिपवून टाकणारे सेट्स आणि पोशाख, मोहक निसर्गस्थळांचा पार्श्वभूमीवर वापर करून आपल्या कानांसोबत डोळ्यांनाही सुखावेल अशी निर्मिती केली आहे.

मात्र नाटकात मी पाहिलेला एक प्रसंग आहे. ज्यात कविराज गाणे ऐकल्यानंतर एकाच वेळी तृप्त आणि भावूक होतात. आपल्याला संगीतातले कळत असले तरी गाता येत नाही अशी भावना त्यांना काहीशी दुःखी करते. हा सिन चित्रपटात वगळला आहे.

तो सिन मनाला एकदम भिडला होता कारण माझी अवस्थासुद्धा तशीच आहे. उलट त्यापेक्षा बिचारी. संगीतात गळा तर सोडा कानसुद्धा तयार नाही.

पण सर्व प्रकारचे संगीत ऐकून आस्वाद घेण्याची इच्छा आहे. पुलंच्या रावसाहेबांसारखं आहे तपशील कळले नाहीत तरी चांगले वाईट एवढे तर कळते.

हल्ली बालगंधर्व आणि आताचा कट्यार या चित्रपटाच्या माध्यमातून आधी शास्त्रीय न ऐकणारी मंडळी थोडी त्या दिशेला वळत आहेत हि चांगली चिन्हे आहेत.

सर्वांचे अभिनय उत्तम. शंकर महादेवन हे या चित्रपटातले अभिनयातले सरप्राईज पॅकेज.

कथा पटकथा संगीत सर्वच उत्कृष्ट.

या मूळ नाटक समोर आणणाऱ्या महान लोकांविषयी काही बोलण्याची तर गरज नाहीच.

त्यांना नमन करूनच, नव्या उत्साहात शास्त्रीय संगीत, संगीत नाटके, त्यावर चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे सर्वांपर्यंत पोचवणाऱ्या राहुल देशपांडे, आनंद भाटे, महेश काळे, अजय पुरकर, सुबोध भावे या सर्वांनाही सलाम.

आज काळजात घुसलेली संगीताची कट्यार आणि ओठांवर बसलेली गाणी आपापली जागा सोडणे अशक्य.

Monday, November 9, 2015

वॅली ऑफ फ्लॉवर्स : २ : बंद घाटातुन गोविंदघाटापर्यंत

मागील लेखात सांगितल्याप्रमाणे माझी पुणे दिल्ली ट्रेन रद्द झाली आणि मला मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट काढणे भाग पडले. त्यामुळे माझ्या प्रवासाची सुरुवात पुणे ते मुंबई ट्रेनने झाली. बाहेर मस्त पावसाळी वातावरण होते. ट्रेन जेव्हा लोणावळ्या खंडाळ्याजवळुन जात होती, तेव्हा खूपच छान दृश्य दिसत होते.

हिरवेगार डोंगर, धबधबे, तळी असे सर्व पाहताना छान उत्साह येत होता. डोंगरदऱ्या, काही ओळखु येणारे किल्ले पाहुन वाटत होते आत्ता इथेच उतरून ट्रेकला जावे.

मुंबईला पोहचुन विमान पकडले, दिल्लीला गेलो. दिल्लीला सगळे भेटलो, मग हरिद्वारची ट्रेन पकडली. हरिद्वारपर्यंत संध्याकाळी पोहोचलो.

आधीच अंधार पडलेला होता. इथपर्यंतचा प्रवास आम्ही आमचा केला होता. इथून पुढे ट्रीपचे पॅकेज सुरु होणार होते. हरिद्वारपासून पुढे सगळी हॉटेल्सची बुकिंग, हरिद्वार ते गोविंद घाट आणि परत अशी खाजगी गाडी, हे सगळे त्यात होते.

हरिद्वार पुढे एटीएम सहजासहजी मिळणार नाही त्यामुळे लागेल तितकी रक्कम आधीच काढून घ्या अशी सूचना त्यांनी दिलेलीच होती. त्यामुळे स्टेशन बाहेर पडलो कि आवारातच आम्ही सगळ्यांनी रांगा लावुन पैसे काढले.

ऑपरेटरला आम्ही फक्त आगाऊ रक्कम दिलेली होती, बाकी सगळी आम्ही गोविंदघाटला पोचल्यावरच देणार होतो. ती रक्कम अधिक आम्हाला खर्चासाठी लागणारी अशी प्रत्येकाची वैयक्तिक रक्कम बरीच होती. त्यामुळे दहाजण दोन एटीएमवर तुटून पडले तेव्हा आमच्या मागे रांगेत असणारे पोचेपर्यंत तर जाऊच दे, आमच्यातच जे शेवटी होते त्यांचा नंबर लागेपर्यंत काही रक्कम शिल्लक राहते का अशी गमतीशीर भीती वाटत होती.

सगळ्यांचे पैसे काढून झाल्यावर दोन रिक्षा ठरवून आम्ही हॉटेलला गेलो. अंधार पडलेला होता, आधी सगळ्यांची हरिद्वारमध्ये फिरण्याची इच्छा होती, पण आता थकव्यामुळे, उशीर झाल्यामुळे, भूक लागल्यामुळे आम्ही ते रद्द केले. रिक्षातून जाताना दिसेल तशी गंगा, घाट, मंदिरे, दिवे सगळे पाहत जात होतो.

हॉटेलला पोचून जेवण केले, आणि काही वेळात झोपलो. उद्या सकाळी लवकर उठून जायचे होते.

हरिद्वार ते गोविंद घाट हा जवळपास ८-१० तासांचा प्रवास आहे. वाटेत ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग अशी ठिकाणे आहेत. तिथे थांबत थांबत जायचे, त्यात चहा, जेवण असे आवश्यक थांबे आलेच. आणि दरड कोसळली तर प्रवास आणखी लांबतो. हे सर्व पकडून जितके लवकर निघाल तितके चांगले.

पहिल्या दिवशीपासूनच रोज सकाळी सर्वांना उठवण्याची जबाबदारी स्नेहाने घेतली होती. ती स्वतः उठून सगळ्यांच्या रूमचे दरवाजे वाजवून जागे करायची. आणि असे करूनसुद्धा आवरायला तिलाच वेळ लागायचा. ती आणि हरप्रीत हे आमच्याकडचे तयार व्हायला सर्वात जास्त वेळ घेणारे सदस्य. 

आम्ही तयार झालो, तरी ड्रायवरने येउन शांतपणे सामान लावत, गाडी साफसुफ करत निघायला बराच वेळ घेतला. १० जण असल्यामुळे आम्हाला टेम्पो मिळाली होती. ड्रायवरचं नाव मनोज. अगदी लहानसर चणीचा. एवढा छोटा दिसणारा माणुस एवढी मोठी गाडी चालवताना पाहुन आश्चर्य वाटेल. पण तो इतकी वेगाने आणि भन्नाट गाडी चालवत होता कि बस.

तिकडचे रस्ते आपल्यापेक्षा बरेच वेगळे आहेत. उंच डोंगरातले घाट, निमुळते रस्ते, तीव्र उतार आणि चढण, तितकेच तीव्र वळण. जिथे आपण एक गाडी चालवायला पुढे मागे पाहू, तिथे हे लोक बिनधास्त दोन्ही बाजूने गाड्या पळवतात. शैलीदार कट मारतात. ते कशी गाडी चालवत आहेत ह्याकडे लक्ष दिले कि आपलेच ठोके वाढतात. मधून मधून "भैय्या आरामसे" म्हणत आपल्यालाच आरामसे घेत दुर्लक्ष करावे लागते.

हरिद्वारहून निघालो आणि ऋषिकेश जवळ कुठेतरी एका कार्यालयासमोर गाडी थांबली आणि ड्रायवर उतरून काही वेळ गायब झाला. मग आम्ही उतरून बघत होतो कि का थांबवली.

एकमेकांना विचारत होतो कि "क्यू रोका है यार?"

एक म्हातारे दाढी वाढवलेले साधु लुक असलेले बुवा आले, आणि कार्यालयाकडे बोट दाखवून म्हणाले "वहा आपका 'पंजीकरण(?)' किया जाता है".

आम्ही बघायला गेलो कसलं पंजीकरण. उत्तराखंड पोलिस आणि सरकार, तिथे तीर्थयात्रेसाठी येणाऱ्या सर्व प्रवाशांची माहिती गोळा करते. नाव, पत्ते, फोन नंबर, घरचे नंबर आणि कुठल्या ठिकाणी प्रवासाला जाणार अशी सगळी महत्वाची माहिती. उत्तराखंडमध्ये दरड कोसळणे, हवामान खराब होणे, पूर येणे असे प्रकार होत राहतात. त्यामुळे कुठल्या ठिकाणी साधारण किती प्रवासी आहेत याचा अंदाज येतो.

प्रत्येक प्रवाशाला एक कार्ड मिळतं. काही अनुचित प्रकार घडला, तर ओळख पटवायला याचा उपयोग होऊ शकतो.



तिथेच बाहेर एका फलकावर तिथल्या प्रमुख तीर्थस्थळांच्या वातावरणाची माहिती लावली होती.

आम्हाला याचं कौतुक वाटलं. आणि आणखी कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आम्ही तिकडे असेपर्यंत आम्हाला उत्तराखंड पोलिसकडून कुठल्या रस्त्यांवर दरड कोसळली आहे, कुठे काम चालू आहे, कुठे रस्ता बंद आहे याचे मेसेज येत होते. परत येताना त्याचा फायदा झाला.

ते करून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. एका ठिकाणी थांबून नाश्ता झाला. तिथे निखिलने (आमच्या बहुभाषिक बहुप्रांतीय मंडळातला तेलगु प्रतिनिधी) मेन्युकार्ड न बघता वडा सांबर घेणार म्हणुन सांगितलं. आम्ही इथे कसे मिळेल म्हणुन हसत होतो. तो एकदम विश्वासाने म्हणाला कि आता सगळीकडे मिळतं. पण मेन्युकार्ड आल्यावर त्याचा पोपट झाला. या गोष्टीवरून त्याची पूर्ण ट्रीपमध्ये आम्ही उडवली. "अरे इसको वडा सांबर दो", जो त्याला परतीच्या मार्गावर लागेपर्यंत कुठेही मिळाला नाही.

जाताना देवप्रयागचा संगम लागला. पाहायला अगदी छान. दोन नद्यांचा वेगळ्या रंगाचा प्रवाह एक होताना दिसतो. तिथे काही वेळ थांबून फोटो काढले आणि निघालो.



तिथून निघालो आणि मग पुढे घाटात आम्ही अडकलो. बरंच पुढे कुठे तरी दरड कोसळली होती, ती काढण्याचं काम चालु होतं आणि गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली होती. आम्हाला पुढे फक्त गाड्या दिसत होत्या. काम काही दिसत नव्हतं आणि किती दूर आहे, किती वेळ लागेल काही अंदाज येत नव्हता.

सगळ्या ड्रायवर लोकांनी गाड्या बाजूला लावल्या. बहुतेक सगळे एकमेकांना ओळखत होतेच आणि अशा ठिकाणी नव्या ओळखीपण होतात. त्यांनी आपला गप्पांचा अड्डा जमवला. आम्ही एका हॉटेलच्या अंगणात फतकल मारली, आणि आमचा अड्डा जमवला.

काही तास तरी लागतील असा नूर दिसत होता. तिथेच दुपारचं जेवण करावं का असा विचार केला. पण नुकताच नाश्ता झाला असल्यामुळे कोणालाही भूक नव्हती. तसाच टाईमपास चालु होता. वेळ लागायला लागला तसा आम्ही गमतीने या हॉटेलमधेच रूम घ्यावी कि काय असाही विचार करायला लागलो.

आमच्याच कंपनीकडे बुकिंग केलेल्या आणखी दोन तीन गाड्या म्हणजेच आणखी ग्रुप होते. त्यातले एक मराठीच होते. त्यांनी खरोखर रूम घेऊन टाकली आणि आत जाऊन बसले. आम्ही नुसता विचारच करत होतो.

हरप्रीत आणि अंगद तिथे बसण्याचा कंटाळा आला म्हणून "बघू तरी पुढे काय झालंय नेमकं" म्हणत चालत पुढे निघाले. आणि चालत चालत ते जवळपास ६-७ किमी पुढे गेले होते. असं ते म्हणत होते. आम्हाला खरं वाटत नव्हतं. कारण हरप्रीत आदल्या दिवशी पोटदुखीमुळे एकदम परेशान होता. पण शक्यता नाकारतासुद्धा येत नव्हती. दोघं पंजाबी, अति उत्साही.

त्यांचा काही वेळात फोन आला, कि इथलं काम झालंय, गाड्या निघतायत. ड्रायवरला सांगून पटकन निघा. आम्ही ताबडतोब उठून ड्रायवरला शोधलं, माहिती सांगितली, आणि निघायला सांगितलं. पण तो तयार होत नव्हता. तो म्हणाला दोन्हीकडून गाड्या येऊ जाऊ देत. अशी रांगेबाहेर गाडी काढणं बरोबर नाही. पोलिस पकडतात, आणि ड्रायवरच फसतो.

हळूहळू गाड्या सरकायला लागल्या. तिकडून हरप्रीत अंगदचे फोन वर फोन येत होते, आणि इकडे हा निघायला तयार नव्हता. तो म्हणाला कि लाईन सोडायला नाही पाहिजे, अजून प्रॉब्लेम होतो. "ये पहाडी इलाका है साबजी. यहा का तरीका अलग होता है."

काही वेळाने आमच्या समोरच्या गाड्या हलल्या तेव्हा कुठे आम्ही निघालो. रांग अगदी काही फुट पुढेपुढे सरकत होती. काही छोट्या गाड्या, जीप वगैरे रांगेबाहेर जाउन पुढे जात होते. काही वेळाने आम्ही थोडं पुढे पोचलो, तेव्हा अशा गाड्यांमुळे खरच अडथळे झाले होते, मग त्या गाड्या पुन्हा मागे येउन रांगेत घुसत होत्या.

सगळे लोक त्यांच्यावर चिडले होते, तुमच्यामुळे अर्धा एक घंटा अजून वाढला म्हणून लाखोली वाहत होते. आम्हीसुद्धा त्यांच्या नावाने शंख करत होतो. ड्रायवर म्हणाला ते खरंच होतं. सगळे शांतपणे रांगेत राहिले तर परिस्थिती लवकर हाताळता येते. उतावळेपणामुळे समस्या वाढते. ड्रायवरने आम्हाला सुनावलंच मग, "देखा साबजी, आपकी सुनके गाडी आगे ले लेता तो यु हि बीच मी फस कर सबकी गाली खा रहा होता."

आम्ही खाली उतरून फोटोबिटो काढले, असाच टाईमपास केला. एक एक करत बाकी लोकांनापण गाडीत बसून राहायचा कंटाळा आला आणि पायीपायी पुढे निघाले.

वेळ चालला होता, आणि आम्ही आज गोविंदघाटला पोचतो कि नाही अशी शंका येत होती. कारण तिकडे रात्री रस्ते बंद करतात. आम्ही रस्ते बंद होण्याआधी त्या मार्गावर लागणे आवश्यक होतं.

जिथे काम चालू होते ती जागा आली आणि एकदाचे आम्ही त्या जाममधून बाहेर निघालो. तो भागच तसा होता. तिथे नेहमी अशा घटना होत राहतात. चालत निघालेले सगळे वेगवेगळ्या टप्प्यावर भेटले. सर्वात शेवटी हरप्रीत आणि अंगद. सगळ्यांना गाडीत घेऊन निघलो.

काही अंतरावरच एका हॉटेलमध्ये थांबलो. पण तिथे सगळ्या आत्ता जाममधून सुटलेल्या गाड्या थांबल्या होत्या. लवकर काही खायला मिळण्याची चिन्हे नव्हती. आम्ही तिथे जेवण्याचा विचार सोडला आणि पुढे काहीतरी खाऊ असा विचार केला.

बराच उशीर झालेला असल्यामुळे रुद्रप्रयागचा संगमसुद्धा न पाहता सोडला. एका ठिकाणी फक्त थोडी फळे वगैरे सामान गाडीतच खायला म्हणून घेतली. कुठे थांबून जेवायला वेळ नव्हता.

गोविंदघाटच्या थोडं अलीकडे असलेल्या जोशीमठला पोचलो तेव्हा अंधार पडून गेला होता. तिथे आमच्या टूर कंपनीचे ३ गाईड आमच्या गाडीत चढले. आता पुढे जाता येईल कि नाही यावर त्यांची चर्चा चालू होती. शेवटी प्रयत्न करायचे ठरले.

रस्त्यात पोलिसांनी अडवून दटावलेच, कि अंधार पडलाय, आता रस्ता बंद. पण थोडी विनंती केली, आमची गोविंदघाटमध्ये बुकिंग आहे, यावेळी जोशीमठला राहायची गैरसोय होईल, दरड कोसळली वगैरे सगळ्या गोष्टी सांगून जाऊ देण्याची विनंती केली. त्यांनी शेवटी आमचं ऐकलं.

इथून पुढे जाता जाता सगळ्यांचे मोबाईल कवरेज गेले. हेही अपेक्षित होते. तिकडे फक्त बीएसएनएल आणि आयडिया चालतात असे आम्हाला सांगितलेच होते. त्यामुळे दोघातिघांनी ते सीम आणले होते.

थोड्यावेळात गोविंदघाटला हॉटेलवर जाउन पोहोचलो. आमचे टूर मॅनेजर देवकांत संगवान यांनी आमच्या ड्रायवरची पाठ थोपटली. "लडके तू विनर है. फर्स्ट आया है आज. हरिद्वारसे निकले हुए सब अभी तक जोशीमठभी नही पहुचे. अब उनको तो वही रुकना पडेगा. बस तू यहा तक आ गया आज."

आम्हीपण आमच्याकडून थोडी बक्षिसी त्याला दिली. वर जाऊन फ्रेश झालो. देवकांतशी दुसऱ्या दिवशीच्या प्लानवर चर्चा केली. पैसे देऊन आमचे (मानसिक) ओझे हलके केले. आणि गरमागरम जेवणावर ताव मारून झोपलो. दुसऱ्या दिवशीपासून ट्रेक चालु. 

Wednesday, November 4, 2015

वॅली ऑफ फ्लॉवर्स : १ : कशीबशी केलेली बुकिंग

माझी पहिली नोकरी होती मुंबईला "ओरॅकल फिनान्शियल सर्विसेस" येथे. तिथे माझ्यासोबत कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या आणखी काहीजणांनी एकाच दिवशी कंपनीत आणि करियरमध्ये प्रवेश केला. पुढचे २-३ महिने आमचं सोबत प्रशिक्षण झालं. अगदी पद्धतशीर वर्गात बसुन, कॉलेजसारखंच (वातावरणाच्या बाबतीत) पण दर्जा खूप चांगला. त्यानंतर १-२ वर्ष आमचे प्रोजेक्टसुद्धा सारखेच होते. आम्ही एकाच मोठ्या टीममध्ये होतो. त्यामुळे आमची सर्वांची एकमेकांशी मस्त गट्टी जमली.  

या ग्रुपचं नाव पडलं "डस्सुझ". थोडक्यात कारण यातले सगळे आपापल्या पद्धतीने दुसऱ्यांना डसत राहतात. :D म्हणजेच चिडवणे, जोक किंवा टोमणे मारणे, अतिशय पांचट जोक करत राहणे, मनाला वाटेल तसे वागणे. 

यातल्या सगळ्यांनाच फिरायची, चित्रपटांची, संगीताची, मस्ती करायची, पार्टी करायची आवड आहे. आम्ही सगळे सोबत बरेच चित्रपट पाहतो. संगीताच्या कार्यक्रमांना जातो. खरेदी करायला जातो. किल्ल्यांवर ट्रेक करायला जातो. रात्र जागवायला जातो. आसपास फिरायला जातो. 

यात आमचे इतर मित्रसुद्धा कधी सोबत येतात, आणि सगळेच या ग्रुपमध्ये पटकन मिसळून जातात. 

आमची एक पारंपारिक वार्षिक सहलसुद्धा असते. अलिबागला. वर्षातला एक मोठा विकेंड ठरलेला. तेव्हा सगळेजण अलिबागला जाऊन मासे खाणे, समुद्रात खेळणे, रात्री खातपीत खिदळत टाईम पास करणे, एवढाच उद्योग दर वर्षी करतो. जागेत काही बदल नाही. खाण्यात (कोकणात असल्यामुळे) विशेष बदल नाही. तरी इथे जाऊन निवांत वेळ घालवणे सगळ्यांना आवडते. सगळ्यांची बॅटरी रिचार्ज होते. (याबद्दल सविस्तर इथे वाचा.

नंतर बऱ्याच जणांनी कंपनी/शहर बदलले तरी आमच्या ह्या गोष्टी चालूच राहिल्या. गेल्या काही वर्षात आम्ही जवळपास आणि छोट्या मोठ्या बऱ्याच ट्रीप केल्या असल्या, आणि काही ट्रेक केले असले तरी सुट्टी, वेळ अशा कारणांमुळे २-३ दिवसांपेक्षा जास्त, आणि सिल्वासापेक्षा दूरची ट्रीप झाली नव्हती. 

अरूपचे रुममेट (अमेय आणि काही मित्र) वॅली ऑफ फ्लॉवर्सला जाण्याचा बेत आखत होते. उत्तराखंडमध्ये गोविंदघाटजवळ वॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. तिथे दर वर्षी नैसर्गिकरित्या मोठ्या परिसरात कित्येक जातीची रंगबिरंगी फुले येतात. हे अक्खे खोरे फुलांनी आणि रंगांनी बहरून उठते. नैसर्गिकरित्या हे विशेष. हि जागा जागतिक वारसा म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे येथे वाहने नेता येत नाहीत. पायीच जावे लागते.

तर या वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये कैक किलोमीटर्सचा ट्रेक, सोबत जवळच असलेले आणि सर्वात उंच ठिकाणी असलेले हेमकुंड साहिब गुरुद्वारा, जाता येता हरिद्वार, बद्रीनाथ वगैरे असा हा बेत होता. यात ट्रेक म्हणजेच चालणे आणि चढणे पुष्कळ होते. हा जगातला एक प्रसिद्ध ट्रेक आहे. 

त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली. एका कंपनीकडून (ब्लु पॉपीज) त्यांनी सविस्तर प्लानसुद्धा मिळवला. अरूपने तो आम्हाला पाठवला. 



आमच्या ह्या वर्षीच्या अलिबागच्या ट्रीपमध्ये रात्री एक वाजता ह्यावर अगदी जोरदार आणि जोशिली चर्चा झाली. आणि सगळ्यांनी जाण्याची तयारी दाखवली. इतका प्रतिसाद जरा अनपेक्षित होता. अवघड ट्रेक, आणि आठवडाभर सुट्या, ह्यामुळे कमी लोक तयार होतील असं वाटत होतं. 

या प्लानसाठी जितके जास्त लोक असतील तितके सवलत मिळवायला म्हणुन, आणि सोबत मजा करायला म्हणून चांगले. त्यामुळे अरूपने तो आम्हाला, बाकी मित्रांना, आणि आम्ही आमच्या मित्रांना असा सगळीकडे पसरवला.

पण बाकी ठिकाणाहुन म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीला सगळ्यांनी हो हो केलं. आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. त्यावर सगळी प्लानिंग सुरु केली. हळूहळू काही लोक मागे हटले. नंतर ज्यांनी हा प्लान सुरु केला, तेच टंगळमंगळ करायला लागले. शेवटी फक्त आम्ही म्हणजे डस्सुझ तेवढे उरलो. 

आम्ही बाकी कंपनी आणि ट्रेक कंपन्या यांच्याशी बोलून पण तुलना करत होतो. अजून स्वस्त आणि चांगली डील मिळते का बघत होतो. पण काही जणांना खूप आधीपासून सुट्या घ्याव्या लागतात त्यामुळे, आणि वॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये जास्तीत जास्त फुले पाहण्यासाठी जुलैचाच महिना चांगला असे कळले असल्यामुळे आम्ही तारखा आधीपासुन जुलैच्याच ठेवल्या होत्या.

आम्ही केलेल्या तुलनेत आम्हाला आमच्यासाठी ब्लु पॉपीज हाच पर्याय योग्य वाटला, आणि आम्ही तो ठरवून टाकला. आता राहिली प्रवासाची तिकिटे. 

ह्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनुजा (सर्वात जास्त) आणि मी लवकर तिकिटे बुक करा म्हणून आग्रही होतो. हवेत सगळेच गप्पा मारतात पण तिकिटे बुक करणे म्हणजे एक कमीटमेंट आहे. ते केलं कि त्यात एक खात्री येते. म्हणून आमचा हा आग्रह होता. पण काही न काही कारणामुळे ते पुढे पुढे ढकलल्या जात होतं. 

विमानाच्या काही स्वस्तातल्या ऑफर्स डोळ्यासमोर येउन चालल्या होत्या. बुकिंग होत नव्हती म्हणून आमची थोडी चिडचिड चालू होती. आम्ही मग काही दिवस नाद सोडून दिला.

मग आहेत ते लोक बुकिंग करून घेऊ असे म्हणत म्हणतसुद्धा काही दिवस गेले.

असे करता करता मला काही अडचणी आल्या. त्याच महिन्यात माझा अमेरिकेसाठी विसा इंटरव्ह्यू, आणि कंपनीच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे माझे जाणे डळमळीत झाले. अनुजाने निर्वाणीची धमकी दिली, कि आता बुकिंग केले नाही तर मी येणार नाही.

मग आधी मुंबईहून जाणाऱ्यांनी बुकिंग केली. काही दिवसातच मग अनुजा आणि अरूप यांनी पुण्याहुन जाण्याची तिकिटे बुक केली.

सगळ्यांची तिकिटे काढून झाली आणि माझे काही ठरेना. पण शेवटी माझा विसा इंटरव्ह्यू ट्रीपच्या आधीच ठरला, आणि अमेरिकेला जाणे काही दिवस पुढे ढकलले गेले. माझा ट्रीपला जाण्याचा मार्ग आपोआप मोकळा झाला. मी हा दैवी आदेश मानुन माझी तिकिटे बुक केली.

पण मला उशीर झाला होता, विमानाची तिकिटे प्रचंड महाग झाली होती. मी नाईलाजाने पुणे-दिल्ली-हरिद्वार-दिल्ली- पुणे अशी ट्रेनचीच तिकिटे बुक केली. जाताना पुणे-दिल्लीला जाताना एसी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. पण परत येताना मात्र स्लीपर कन्फर्म, आणि एसी तोपर्यंत पुढे सरकेल अशा वेटिंगमध्ये होते, म्हणून दोन्ही काढून ठेवली.

पण दुर्दैव म्हणजे एक आठवडा आधीच मला दिल्लीला जाणारी ट्रेन रद्द झाल्याचा मेसेज आला. का रद्द झाली, कशामुळे काही कळले नाही. त्या दिवशी काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन रद्द होणे वेगळे, पण हे आधीच रद्द म्हणून सांगणे काय प्रकार होता काही कळला नाही.

आता अगदीच ट्रेन रद्द झाली म्हणुन रडावे कि, अगदी शेवटच्या क्षणाला फजिती होण्यापेक्षा एक आठवडा वेळ मिळाला म्हणून हसावे काही कळेना. आता दुसरी कुठली ट्रेन मिळणे शक्य नव्हते, आणि विमानाने जाणे भाग होते. विमान मी ट्रेन तिकीट बुक केले तेव्हापेक्षाही महाग वाटत होते. पुणे दिल्लीचे विमान तर वारंवारता कमी असल्यामुळे मुंबई दिल्लीपेक्षा एरवीदेखील महाग असते, ते आता एकच आठवडा शिल्लक असताना विचारायलाच नको. मुंबई दिल्ली त्यामानाने बरेच स्वस्त वाटले म्हणुन तेच बुक केले.

ट्रीपसाठीचा तयारीतला सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजे तिकिटे काढणे, हॉटेल बुकिंग करणे अशा प्रकारे कसाबसा पार पडला. 

Sunday, August 9, 2015

Indian Philanthropy

I saw one discussion with Aamir Khan and Bill Gates on news channel regarding social issues.

Bill Gates is active in health care issues through his foundation at international level. He has worked effectively on this front in India as well. Aamir Khan has also exhibited his concern for social causes with his popular TV show, "Satyamev Jayate". This program I saw was a discussion on their individual work, and solutions on other issues.

Some readers might not know this, that Bill Gates ranked as the richest person on the earth in fortune lists for several years. He must still be in a leading position in that, I am not sure. He donated half of his wealth for social and charitable causes, to try and solve some issues. Some other billionaires Warren Buffet, Marc Zuckerburg also joined him.

So in this context, he was asked about his experience in this area. And why in India, except for Azeem Premji and few others, no prominent example can be given. The host also asked Aamir for his opinion on this. Aamir quickly pointed out that, it's not that Indians don't donate. They do. But they are inclined to donate to religious institutions like temples, mosques, and churches. If the same donations would get channeled towards other issues, the situation would be different, and god would actually be happier.

In this discussion, they revealed the true picture of Indian mentality. Tirupati temple in India, is the richest religious institution in the world. Every year we read in news papers, that somebody gave millions of rupees, or few kg gold, or a golden crown to Sai Baba/ Tirupati etc. That many temples have collected crores of rupees in their donations.

How useful is it to our nation and our society? The great fakir, Sai Baba, who lived his life with simplicity, and gave the same message through deeds, was worshiped by his followers for those same reasons. But now the irony is, the statue/temple of same Baba gets a golden throne. diamond crown, silk clothes. How does it matter to a common devotee who worships him? 

We worship the gods or such gods-men for what they are, not for what they wear.


The donations given to such institutions are mostly spent on the same institution itself. It's a cycle. The temple grows in size, following, gets developed, redeveloped again and again. Hotels, shops, surround it and an industry grows with that temple at its center.This is very well depicted in the award winning Marathi movie "Deul".

In hindu customs, we make offering of food items to the god, and it is shared among devotees as a 'Prasad'. But now a days, it is not shared, but sold in temples. Outside many temples, you get to see a list of different "Poojas" carried out in that temple, and the rates of priests to do it. I get a feeling of looking at a menu card, it is so actually.

I heard somewhere that all the change that is collected inside temples as a donation is exchanged with notes of shopkeepers who need change. And the temples have their own exchange rates for such transactions.

At every big enough temple, we see lot of poor, crippled, hungry beggars outside. If the temples hold such massive amounts, why don't they take care of such people?

Beggars is altogether a different topic. I don't care for fine and healthy people who can work and earn, instead they beg in the name of god. But what about people who can't work, e.g. very old/ very sick, eunuchs, etc. They don't get earning opportunities easily. If few big temples/ religious institutions show strong will and act for them, they can support them. But we don't see it happening.

The point is the donation in a religious institution is not best deserved. And undeserving donation is as good as money wasted. 

I am not against god. I personally believe in god. I am grateful to him for my life. But I don't believe any more in donating in a temple. Except for a few rare occasions like when i got a job, when i got married, I have not donated much in the temples. Instead, I donate the same amount to a needy and genuine beggar outside.

It is possible, that we can divert our donations to NGOs which are actually benefiting our society, which are doing work that is really required. If a large number of people start doing this, they (good NGOs) will be empowered, and encouraged to work more. Our help would reach the needy people through these organizations, and make them smile. I am very much sure, God would be smiling too. :)

Read this post in Marathi : दानशूर भारत

Sunday, August 2, 2015

कोकण सफर : १० : गणपतीपुळे आणि परत



गणपतीपुळे हे गणपतीचे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. समुद्रकिनारी वसलेले हे सुंदर गणपतीचे मंदिर आणि गाव याबद्दल सर्वांनी ऐकेलेले असते. बऱ्याच जणांनी तिथे नक्किच भेटसुद्धा दिलेली असेल त्यामुळे त्याबद्दल वेगळे सांगत नाही.

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे गणपतीपुळ्याला खूप गर्दी असते आणि हे पक्के व्यापारीकरण झालेले गाव आहे. सगळ्या गोष्टी मग ते जेवण असो कि रूमचे भाडे सर्व बाकी कोकणापेक्षा तुलनेने महाग. आम्हाला महागड्या हॉटेलमध्ये जायचे नव्हते म्हणून घरगुती रूम कॉटेज शोधताना बरेच फिरावे लागले होते. कशीबशी एक रूम आम्हाला मिळाली.

एका ठिकाणी जेवणाला बरीच गर्दी दिसत होती म्हणून तिथे गेलो. भूक लागलेली असताना रात्रीच्या जेवणाला अर्धा पाउण तास प्रतीक्षा करावी लागली आणि तेवढे करून जेवण अगदी नेहमीसारखेच. भाव मात्र नेहमीसारखे नव्हते.

रात्री आम्ही थोडावेळ बीचवर जाऊन गप्पा मारत बसलो होतो. बरीच गर्दी होती तेव्हा पण. छान वाटलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार झालो. आम्ही गर्दीमुळे लवकर मंदिरात जायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यानंतर बीचवर पाण्यात उतरायचा आणि मग परत अंघोळी करून आवरायचा आम्हाला कंटाळा आला होता. अक्षयला तर तसाही पाण्यात विशेष रस नव्हता तेव्हा. गणपतीपुळे तसा धोकादायक बीच आहे.





आम्ही सोबत कुर्ते घेतले होते पण सहलीत कुठे वापरलेच नव्हते. मग मंदिरात पण जायचय, बीचवर पाण्यात नाही जाणार, आणि सहल पण संपलीच आता तर कुठे वापरणार, म्हणून आणलेच आहेत तर घालुयात म्हणून आम्ही कुर्ते घातले.

मंदिरात काही वाटले नाही, पण आम्ही तिघेच्या तिघे कुर्ते घालून बीचवर हिंडायला लागलो तेव्हा सगळे आमच्याकडेच बघत होते, आणि आम्ही हसत होतो.
















बॅटरी अगदी थोडी चार्ज झाली होती. तिथे आम्ही ठरवलं आता काय शेवटचाच दिवस आहे, काढायचे तेवढे फोटो काढून हौस फिटवून घेऊ.




आणि मग आम्ही भरपूर फोटो काढले. उभे, बसलेले, मयुरचे राजकारण्यांसारखे, सर्व प्रकारचे. "सरकार"ची त्याला प्रचंड क्रेझ होती, त्यामुळे ह्या फोटोंमुळेच ह्या सहलीनंतर त्याचे एक टोपणनाव सरकार असे पडले.





















त्यानंतर आम्ही तिथल्या एका कोकण ग्रामजीवन म्युझियममध्ये गेलो. इथे सिद्धगिरी (कोल्हापूर) सारखे एक आभासी कोकणी शैलीचे गाव वसवलेले आहे. आणि गावकऱ्यांची शिल्पे आहेत. पारंपारिक कोकणी गावातले बलुतेदार, त्यांची रोजची कामे करतानाची शिल्पे, यातून कोकणी संस्कृती दर्शविली आहे.

माझे आडनाव खोत आहे. आता माझे कुटुंब तसे देशस्थच आहे. आमच्या कित्येक पिढ्या देशातच वाढल्यात. आमच्या कुटुंबाचा आजोबांनी सांगितलेला इतिहास वेगळ्या पोस्टमधेच लिहावा लागेल. पण खोत हि पदवी मुळची कोकणातली आहे. त्यामुळे ह्या सहलीत अक्षय "देश"पांडे मला कोकणस्थ असल्यावरून, आणि मी माझ्या मुळ ठिकाणी आलोय अशा मुद्द्यावरून चिडवत होता.

त्यात ह्या काल्पनिक गावात खोताचे घर होते. आणि खोताचे अक्खे कुटुंब दाखवले होते. इथली गाईड खोतान्बद्दल माहिती सांगत होती तेव्हा साहजिक माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं होतं. ते पाहून अक्षय पेटला आणि चिडवायला लागला. मग मी पण हे पहा आमचा इतिहास. लोकांनी जतन करून ठेवलाय. तुमचं आहे का कुठलं असं संग्रहालय देशात? देशपांड्याबद्दल कोणी खास माहिती सांगतात का? म्हणून चिडवलं.

त्याला डिवचायला मी गाईडला वन्समोर करून व्हिडीओ रेकॉर्ड केला. अजून पण अक्षय त्या सहलीची आणि कोकणाची, त्या म्युझियमची आठवण काढून मला चिडवतो, आणि आम्हाला हसायला एक निमित्त मिळतं.




गणपतीपुळ्याला आलो तेव्हा आमचा पास संपत आला होता. त्या पासवर आम्हाला घरी जाण्यापुरता एक दिवस शिल्लक होता. पण अक्षयने धांदरटपणाने आमचे तिघांचे पास हरवून टाकले. आम्ही नीट ठेवायला म्हणून एकाकडे ठेवत होतो. पण दुर्दैव असं कि तो हरवला, आणि सुदैव असं कि तो शेवटच्या दिवशी हरवला.

त्यामुळे परतीचा प्रवास आम्हाला तिकीट काढून करावा लागला. मयुरकडे पासची झेरोक्स प्रत होती पण तिचा काही उपयोग झाला नाही.

तिथून मी ठाण्याला माझ्या काही दिवस काकाकडे गेलो. मयुर अक्षय तिथून घरी परत गेले.

परत आल्यावर आणखी एक किस्सा झाला. मध्ये एकदा मेमरी कार्ड भरल्यामुळे आम्ही एका इंटरनेट काफेमध्ये (अति) दर देऊन फोटो कॉपी केले आणि एक सीडी बनवली. मी तिथे कॅमेरा घेऊन बसलो होतो, आणि तो चार्ज झाल्याशिवाय कनेक्ट होणार नव्हता. म्हणून मी तिथेच बसलो, आणि अक्षय मयुरकडे ५० ची नोट देऊन सीडी आणायला पाठवलं . (त्या सहलीत मी कॅशीअर होतो)

त्यांनी फक्त एक सीडी आणली. आम्ही ती भरली आणि मी ती माझ्या बॅगमध्ये ठेवली. ठाण्याला गेल्यावर मी बॅग उघडली तेव्हा तिचा चुराडा झाला होता. आम्ही तिला कव्हर घेऊन त्यात ठेवायला विसरलो होतो. :D

मी लगेच ह्या दोघांना फोन लावला, आणि फोनवर आमची वादावादी झाली.

"तुला नीट ठेवता येत नाही का? माझ्याकडे द्यायची असती. मी निट ठेवली असती"

"तुझी आणि माझी बॅग वेगळी आहे का? सारख्याच आहेत? कशी ठेवली असती?"

"तुम्हाला सीडी सोबत कव्हर आणायला काय झालं होतं? सगळं सांगावं लागतं का?"

असं आम्ही एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. माझा मूड (सगळ्यांचाच) गेला होता थोडा. नंतर औरंगाबादला आम्ही भेटलो तेव्हाहि वाद घातला.

पण कोणावरहि ढकललं तरी शेवटी व्हायचं ते झालं होतं. आमच्या अर्ध्या सहलीचे फोटो गेले होते. मार्लेश्वरच्या पुढचेच फोटो शिल्लक होते. आणि ते अगदी शेवटच्या भागातले . नशीब तेवढे तरी राहिले.

त्यामुळे ह्या लेख मालिकेतले बरेचसे फोटो, त्या ठिकाणचे असले तरी आमच्या सहलीतले नाहीत. नेटवरून घेतलेले किंवा पुन्हा त्या ठिकाणी काढलेले आहेत.

ते फोटो आणि ते क्षण चित्र स्वरुपात उपलब्ध नाहीत, याची खंत जरूर आहे. पण ह्या सहलीत आम्ही खूप धमाल केली, मजा केली. मस्त अनुभव घेतले. हि आमची पहिली इतकी मोठी सहल होती. ते फोटो दुसऱ्यांना दाखवायला झाले असते, पण त्याची फिल्म आमच्या मनात अगदी ताजी आहे. म्हणूनच मी इतक्या वर्षानंतरसुद्धा ह्या सहलीबद्दल इतकं सविस्तर लिहू शकलो.

हे लिहिताना मी ते क्षण पुन्हा जगलो. आम्ही नेहमीच ते आठवत असतो. हे वाचताना माझ्या मित्रांच्या डोळ्यासमोरूनसुद्धा फ्लॅशबॅक सरकला असेल. हि लेखमालिका आम्हाला ह्या सहलीला जाऊ देणाऱ्या आमच्या आई बाबांना, माझ्या सगळ्या मित्रांना, विशेष करून या सहलीचे सोबती अक्षय आणि मयुर यांना, आणि प्रवासाची आवड असणाऱ्या सर्वांना समर्पित. :)