Thursday, July 31, 2014

जकार्ताच्या आठवणी : ७ : तमन सफारी

आतापर्यंत माझे इंडोनेशियामध्ये २ आठवडे चांगले गेले होते. माझी ट्रिप अर्धी संपली होती. तसेच कामाचा महत्वाचा भागसुद्धा संपला होता. आता ऑफिसमध्ये जरा निवांत वेळ चालला होता. बाहेर आणखी मजा करण्यासाठी हीच वेळ होती. विशलिस्टमधली पुढची जागा होती तमन सफारी. ह्या जागेबद्दल माझ्या ऑफिसमध्ये सर्वांनीच खूप शिफारस केली होती. ते कशासाठी हे भेट देऊन आल्यानंतर मलाच समजले. आणि आता मीसुद्धा इंडोनेशियाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला हि जागा सुचवेन.

तमन मिनी इंडोनेशियासारखाच तमन सफारी हासुद्धा (तमन म्हणजे पार्क) अतिशय भव्य आणि नियोजनबद्ध पार्क आहे. ४०० एकरांवरती पसरलेल्या या पार्कमध्ये प्राण्यांनी भरलेले दाट जंगल आहे, एक बेबी झु आहे, फन पार्क आहे, प्राण्यांचे शोज, आणि आणखी काही साहसी खेळ असं बरंच काही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना आखून यशस्वीपणे राबवणाऱ्या इंडोनेशियन लोकांना सलाम!

मागच्या खेपेप्रमाणेच तमन मिनीलासुद्धा माझी एकट्यानेच जायची तयारी होती. पण ऑफिसमध्ये एका सहकाऱ्याने नुकत्याच आलेल्या मीनाक्षीशी ओळख करून दिली. तिची हि दुसरी जकार्ता ट्रीप असली तरी तिने अजून बऱ्याच जागा पाहिल्या नव्हत्या. तमन सफारी तिलासुद्धा पहायचं होतं. ती आणि तिची आमच्याच कंपनीची पण जकार्तामधेच दुसऱ्या क्लायंटकडे आलेली दीपा नावाची मैत्रीण, असे आम्ही तीन जण झालो. आम्ही रविवारसाठी एक टॅक्सी बुक केली.



आमचा टॅक्सीचालक सुजा, हा साधारण इंडोनेशियन लोकांप्रमाणे सुसभ्य आणि प्रसन्न माणूस होता. त्याला यायला दहा मिनिटे उशीर झाला म्हणून त्याने कमीत कमी ३ वेळा आमची माफी मागितली असेल. आम्ही ट्राफिक टाळण्यासाठी सकाळी अगदी लवकर निघालो.

सुजाने त्याला माहित असलेल्या एका शॉर्टकटने आम्हाला तिथे अगदी लवकर पोहोचवलं. त्या खेड्यापाड्यातून जाणाऱ्या रस्त्यावर मला आमच्या लहानपणीच्या दार्जीलिंग ट्रीपचीच आठवण आली. तसाच डोंगराळ भाग, अरुंद रस्ते, चहाचे मळे अशा बऱ्याच सारख्या गोष्टी होत्या. माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दार्जीलिंग सिक्कीमची आमची खूपच झकास ट्रीप होती ती. 



आम्ही तिकीट काढलं आणि या पार्कचा पहिला भाग म्हणजे सफारी सुरु झाली. सफारी म्हणजे आत असलेल्या फन पार्कपर्यंतचा रस्ता घाट आणि जंगलातून जातो. आणि या भागात त्यांनी भरपूर प्रकारचे प्राणी त्यांना नेमून दिलेल्या जागेत सोडले आहेत. अर्थात त्यांच्यावर काही प्रमाणात नियंत्रण असतं. पण ते बांधलेले नसतात. त्यांच्या अगदी नैसर्गिक निवसाप्रमाणे हि जागा असल्यामुळे मोकळे इकडून तिकडे फिरत असतात. या प्राण्यांना सावकाश बघत आतल्या पार्कमध्ये जाताना एक दीड तास सहज जातो. 


तमन सफारीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी लोक गाजर विकत होते. आम्ही ते घेतले नाहीत पण त्यांचं प्रयोजन आम्हाला इथे आल्यावरच कळलं. इथे येणारे लोक गाजर घेऊन येतात आणि जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना खाऊ घालतात. तिथल्या प्राण्यांनासुद्धा याची सवय असल्यामुळे ते गाजराच्या आशेने आपल्या गाडीच्या अगदी जवळ येउन खिडकीतून डोकावतात. 

सफारी खूपच जबरदस्त होती. जिराफ, झेब्रा, हिप्पो, यासारखे बरेच प्राणी मी पहिल्यांदाच पाहिले. आणि वाघ सिंह, अस्वल, यांना आधी पाहिले असले तरी असं मोकळं फिरताना कधीच नाही. पिंजऱ्यामध्ये किंवा सर्कसमधेच पाहिले होते. 

माझा नवाकोरा कॅमेरा वापरायला हि सुवर्णसंधी होती. आणि मी ती पुरेपूर वापरली. अशा प्राण्यांचे फोटो काढून मला खूपच आनंद झाला. माझ्यासाठी इंडोनेशिया ट्रीपमधला तो सर्वात भारी दिवस होता. मी सतत फोटोच काढत होतो. त्या दिवशी मी शेकडो फोटो काढले असतील.  


आता याला खरीखुरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तर नाही म्हणता येणार. कारण ते प्राणी पिंजऱ्यात जरी नसले तरी नियंत्रित होतेच. पण माझ्या मते प्राण्यांना जवळून बघण्यासाठी साधा झु आणि खरं जंगल यातला हा सुवर्णमध्य आहे. 

खऱ्या जंगलामध्ये एका जंगली प्राण्याच्या दर्शनासाठीसुद्धा कधी कधी एक दिवस निघून जातो. कधी कधी तर काहीच हाती लागत नाही. माझे फोटोग्राफर मित्र सांगतात कि कधी कधी जंगलात २-३ सफारी करूनसुद्धा एकदाहि वाघ सिंह दिसत नाहीत. आणि साध्या झुमधले प्राणी अतिशय सुस्त आणि कंटाळलेले वाटतात. तमन सफारीसारख्या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राण्यांना पाहण्याची खात्री असते, आणि ते मोकळे फिरत असतात. त्यांना नेमुन दिलेली निवासस्थानेसुद्धा त्यांच्या नैसर्गिक निवासांसारखीच असतात.

हा पार्क मला खूप आवडला. मला असा एखादा पार्क भारतातसुद्धा असावा असं वाटून गेलं. या धर्तीवर बनवलेला पार्क अजून मला तरी माहित नाही. अशा प्राण्यांचे फोटो काढण्याची हि माझी पहिलीच वेळ होती. आणि लवकरच खरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करण्याचीसुद्धा संधी मिळावी अशी इच्छा आहे. 

सफारीमधले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

सफारी जवळपास दोन तासांत संपली. आणि आम्ही आतल्या फन पार्कमध्ये पोचलो. हा बाकी कुठल्या हि फन पार्कसारखाच होता. काही राईड्स, प्राण्यांचे खेळ, 4D सिनेमा, खाण्याचे अड्डे, असं बरंच काही होतं. इथली विशेष गोष्ट म्हणजे इथे पेंग्विन्स, आणि कोमोडो ड्रॅगन पाहायला मिळतो. (हा ड्रॅगन सिनेमामध्ये आपण पाहतो तसा मुळीच दिसत नाही. आणि आगसुद्धा ओकत नाही. :D )


पार्कच्याच बाजूला एक बेबी झु होता. तिथे माणसाळलेले सिंह वाघ, त्यांचे बछडे, साप माकड असे प्राणी होते. थोडी फी भरून इथे तुम्ही या प्राण्यांसोबत फोटो काढू शकता. मी सिंहासोबत एक फोटो काढून घेतला. तो सिंह बांधलेला होता, त्याचा ट्रेनर छडी घेऊन समोर उभा होता, तरी त्याच्या बाजूला बसून फोटो काढायला थोडी भीती वाटतेच. :D 

बेबी झु आणि फन पार्कमधले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


त्या पार्कमध्ये आणखी बरेच शो होते. सी लायन शो आणि डॉल्फिन शो मी पुन्हा एकदा पाहिले. त्या नंतर काऊ बॉय शो पाहिला, बाइकवरचे स्टंट पाहिले. आणि शेवटी एक टायगर शो पाहिला. टायगर शो मधले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तमन सफारीमधला दिवस खूपच छान गेला. मला इथे येउन गेल्याबद्दल खूप आनंद झाला. तुम्ही जर कधी इंडोनेशियाला गेलात तर तमन सफारीमध्ये नक्की जा. :)

Wednesday, July 30, 2014

जकार्ताच्या आठवणी : ६ : डॉल्फीन आणि सी लायन शो

मी थाउजंड आयलंडहून परत जकार्ताजवळच्या अन्चोलमधल्या डॉकवर पोहोचलो तेव्हा नुकतीच दुपार उलटली होती. आजूबाजूला फिरायला अजूनही अक्खी संध्याकाळ माझ्या हातात होती. अन्चोलमध्ये या डॉकजवळच एक एस्सेल वर्ल्डसारखा करमणुकीचा पार्क आहे. मी तिथे जायचं ठरवलं. 

तो पार्क मुख्यतः लहान मुलांसाठीच बनवलेला आहे. पण तिथे राईड्सशिवाय आणखी प्राण्यांचे खेळसुद्धा होते. आणि मला त्यात जास्त रस होता. मी तिथे पोहोचलो तेव्हा थोडा उशीर झालेला होता. पार्क बंद होईपर्यंत काही मोजकेच शो शिल्लक होते. त्यातला पहिला शो म्हणजे सी लायन शो. 

मी सी लायन हा प्राणी प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहत होतो. आणि त्याला पाहून मला त्याला सी लायन का म्हणतात हा प्रश्न पडला. तो प्राणी सिंहापेक्षा जास्त कुत्र्यासारखा दिसत होता. माझ्या मते त्याला सी डॉग हे नाव जास्त समर्पक झालं असतं. 

भारतात आता सर्कशीमध्ये प्राण्यांचा अशाप्रकारे वापर करण्यावर खूप बंधने आली आहेत. त्यामुळे असे खेळ आता पाहायला मिळत नाहीत. मी शेवटची सर्कस खूप वर्षांपूर्वी लहानपणीच पाहिली असेल. 

या शो मध्ये ३ सी लायन होते. आणि प्रत्येकी एक ट्रेनर होता. त्यांनी बॉलशी खेळणे, बॉल नाकावर तोलून धरणे, कॅच कॅच खेळणे अशा अनेक करामती करून दाखवल्या. ट्रेनर त्यांना शोमध्ये खेळवत ठेवायला म्हणून कायम काहीतरी खाऊ घालत होते. 

मग एका सी लायनने ट्रेनरसोबत कपल डान्ससुद्धा केला. त्या दोघांनी एकमेकांना कीस सुद्धा केलं. पोटापाण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं पहा. :D

त्या सी लायन्सना माणसासारखे बरेच हावभाव शिकवले होते. ते आपल्या परीने टाळ्या वाजवत होते, सलामी देत होते, नाचत होते. त्यांना चक्क थोडं गणितसुद्धा शिकवलं होतं. ट्रेनरने प्रेक्षकांना दोन आकडे सांगायला सांगितलं. प्रेक्षकांनी वेगवेगळे आकडे सांगितले होते. पण त्याने नेमके त्याला हवे असलेलेच सोयीचे आकडे घेतले. :D त्याने एका पाटीवर ४X२ लिहिले आणि सी लायनला दाखवले. उत्तरादाखल सी लायनने त्याच्या समोरची घंटा ८ वेळा वाजवली. अर्थात त्यांना गुणाकार शिकवला नसेल. पण ८ चा आकडा त्यांच्या डोक्यात बसवणे सुद्धा काही कमी नाही.

सी लायन शोमधले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लीक करा

सी लायन शोनंतर लगेचच मी डॉल्फिन शो पाहायला गेलो. हा शो मला आधीच्या शोपेक्षा जास्त आवडला. या शोसाठी केलेली व्यवस्था मस्त होती. गोलाकार स्टेडीयम होते. आणि समोर एक पुरेसा मोठा स्विमिंग पूल, ट्रेनर्सना उभे राहण्यासाठी जागा, आणि त्यामागे एक मोठी स्क्रीन होती. 

शो सुरु होण्यापूर्वी त्यांनी त्या स्क्रीनवर स्टेडीयममधील प्रेक्षकांना दाखविण्यास सुरु केले. कॅमेरा कोणाकडे तरी वळून तो माणूस स्क्रीन वर दिसत असे. अशा स्क्रीनवर आलेल्या माणसांची प्रतिक्रिया फारच मजेदार असे. बाकीचे प्रेक्षक हसून आणि टाळ्या वाजवत दाद देत होते. काही क्षणापुरता मीसुद्धा स्क्रीनवर आलो होतो. 

त्यानंतर एका डॉल्फिनबद्दलच्या व्हिडीओने शोला सुरुवात झाली. डॉल्फिन्सना वाचवा अशा आशयाची ती क्लिप होती. त्याच्या शेवटी पडद्यावर आणि प्रत्यक्षात एकाच वेळी डॉल्फिन पाण्याबाहेर उसळून येतात आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो. 

त्यानंतर मग डॉल्फिन्सनेसुद्धा रिंगमधून उडी मारणे, ट्रेनरसोबत पोहणे, बॉल खेळणे, नाकावर रिंग खेळवणे अशा अनेक करामती करून दाखवल्या. त्या ट्रेनरला डॉल्फिनसोबत इतकं सहज पोहताना पाहून मलासुद्धा डॉल्फिनसोबत पाण्यात उतरून खेळण्याची इच्छा झाली. डॉल्फिन हे खूप हुशार म्हणून समजले जातात. काही दिवसानंतर इंडोनेशियामध्ये काही पार्क्समध्ये डॉल्फिनसोबत आपल्याला पण खेळता पोहता येतं हे कळलं पण ते करण्याची संधी मिळाली नाही.

डॉल्फिन शोमधले फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डॉल्फिन शोनंतर त्या पार्कमध्ये एकाच शो उरला होता तो म्हणजे एक छोटासा 4D सिनेमा. तो फारच कंटाळवाणा होता. एकतर ती एक घीसीपिटी काऊबॉय स्टोरी होती. त्यातले 4D इफेक्ट्स म्हणजेच खुर्चीला दिलेल्या हालचाली अर्थहीन होत्या. त्यांचा सिनेमामधल्या गोष्टीशी फारसा संबंधच नव्हता. उगाच द्यायच्या म्हणून दिलेल्या वाटत होत्या.

यानंतर पार्क बंद झाला. बाजूलाच एका ठिकाणी लेजर शो होता. मी तोदेखील पाहिला. तो काही विशेष नव्हता. त्यातली एकमात्र नवी गोष्ट म्हणजे लेजर आणि मोठे पाण्याचे कारंजे यांचा एकत्रित वापर करून पाण्याच्या फवाऱ्यावर त्यांनी त्रिमितीय प्रतिमा बनवल्या होत्या. पण ते सोडता तो शो कंटाळवाणा होता. 

एका बेटावर सफर, स्नोर्केलिंग, त्यानंतर काही झकास शोज, असं मी एका दिवसात बरंच काही बघितलं होतं. लेजर शोनंतर एका भारतीय हॉटेलमध्ये जेवण केलं. हॉटेलमध्ये परत जाईपर्यंत खूप थकलो होतो. रूममध्ये पोचताक्षणी बेडवर आडवा होऊन मी झोपून गेलो. पुन्हा तो नकोसा सोमवार उगवण्याआधी पुरेसा आराम आवश्यक होता. :)

Monday, July 28, 2014

जकार्ताच्या आठवणी : ५ : सहस्र द्विप

गेल्या आठवड्यात तमन मिनी येथे एक दिवस मस्त गेल्यावर, पुढच्या वीकेंडकडून माझ्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. पण मला पुन्हा तीच अडचण आली. मला कोणीही सोबत मिळत नव्हते. गेल्या आठवड्यात, सुदैवाने मला हॉटेल लिफ्टमध्ये राहुल भेटला आणि आम्ही तमन मिनीला जाण्याचा प्लान केला. या आठवड्यात ते शक्य झाले नाही. राहुल आणि माझ्या ऑफीसमधले बरेचजण या आठवड्यात भारतात परतले.

शेवटी मी कुठेतरी एकट्यानेच जायचं ठरवलं. अशा वेळी मला टागोरांचे "एकला चलो रे" हे गीत आठवते. कोणीतरी सोबत मिळाले तर चांगलंच, पण कोणी नाही मिळालं तर आपण का म्हणून अडून रहावं? आपण स्वतःच आपल्याला सर्वात उत्तम साथ देऊ शकतो. मला सिनेमे पाहण्याची, नवीन ठिकाणी जाण्याची, फोटो काढण्याची अशा अनेक आवडी आहेत. आणि गरज पडल्यास मी ह्या गोष्टी एकट्यानेच या आधीपण केल्या आहेत. 

आता प्रश्न होता जायचं कुठे? इंटरनेटवरची माहिती, ऑफिसमधल्या लोकांकडून मिळालेली माहिती, या आधारे मी जकार्ताच्या आजूबाजूच्या चांगल्या ठिकाणांची एक यादीच बनवली होती. सहस्र द्वीप म्हणजेच थाउजंड आयलंड्स त्या यादीत होतंच. एका मित्राने मला सांगितले होते कि यातल्या काही बेटांवर स्कुबा डायव्हिंग करता येतं. बस हे ऐकून मी तिथेच जाण्याचं पक्कं करून टाकलं. 



मी खूप आधी माझ्या एका पोस्टमध्ये सांगितलं होतं कि, स्कुबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग या गोष्टी करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे. आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा पाहिल्या पासून हि इच्छा प्रबळ झाली आहे. 


जकार्ताजवळच समुद्रात हजारो लहानमोठ्या आकाराची बेटे आहेत. म्हणूनच या भागाला थाउजंड आयलंड्स म्हणतात. काही बेटे इतकी छोटी आहेत कि तिथे चीटपाखरूसुद्धा राहत नाही. काही बेटे जी पुरेशी मोठी आहेत तिथे छोटी खेडी वसलेली आहेत. आणि काही सुंदर बेटांवर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स विकसित करून पर्यटनाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

जी बेटे जकार्ताच्या जास्त जवळ आहेत त्यांच्यावर जकार्ता शहरातील प्रदूषणाचा परिणाम झालेला आहे. पण जी बेटे बऱ्यापैकी लांब आहेत, तिथे मात्र पाणी आणि वातावरण खूप स्वच्छ आहे. आणि ती बेटे अगदी स्वच्छ नितळ पाणी, आणि वैविध्यपूर्ण प्रवाळे यासाठी प्रसिद्ध आहेत. स्कुबा डायव्हिंगची सुविधा असल्यामुळे मी सेपा बेटावर जायचं ठरवलं. 

माझे मित्र तिथे गेले होते तेव्हा एक स्कुबा डायव्हिंग करणारा मोठा ग्रुप आलेला होता. त्या लोकांनी स्कुबा डायव्हिंगचे सगळे किट्स घेऊन टाकले. त्यामुळे माझ्या मित्रांना डायव्हिंग करता आलं नव्हतं. असंच काहीतरी माझ्यावेळीसुद्धा घडण्याची शक्यता होतीच. पण तो म्हणाला कि स्कुबा डायव्हिंग नाही करता आलं तरी स्नोर्केलिंग करता येतं, आणि ते बेट खूपच सुंदर आहे. एकदा जाऊन येण्यासारखं नक्कीच आहे. 

रविवारी सकाळी मी टॅक्सीने अन्चोल डॉकपर्यंत गेलो. तिथूनच या सर्व बेटांवर जाण्यासाठी बोट्स निघतात. तिथे आणखी एक अडचण आली. सेपा आयलंडवर जाण्यासाठी मी एकटाच होतो. आणि त्यामुळे जर सेपा आयलंडला जायचं असेल तर मला दुप्पट भाडे लागणार होते. तिथल्या डेस्कवरच्या मुलीने मला दुसऱ्या कुठल्यातरी बेटावर जा म्हणून सांगितलं. मी सांगितलं कि मला स्कुबा डायव्हिंग करायची इच्छा आहे म्हणून मला सेपाला जायचंय. मग तिने सांगितलं कि पुत्री आयलंडवरसुद्धा स्कुबा डायव्हिंग आहे. आणि सगळी बेटे जवळपास सारखी आणि तितकीच सुंदर आहेत. तुम्ही पुत्री आयलंडला जा, आणखी काही लोकपण तिकडे जात आहेत. तुम्हाला शेअरिंगमध्ये भाडे कमी लागेल. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हताच. मी पुत्री आयलंडच्या बोटीमध्ये चढलो. 

आम्हाला त्या बेटावर पोहचायला दीड दोन तास लागले. जाताना आम्ही अक्षरशः शेकडो बेटे पाहिली. अगदी निळेशार पाणी आणि आमच्यासोबत समुद्रात आणखी बऱ्याच बोट्स होत्या. 

बेटावर पोहोचल्यावर लगेच जाणवलं कि या बेटांबद्दल आपण जे काही ऐकलं ते सगळं खरं आहे. अगदी नितळ आणि पारदर्शक पाणी. इतकं स्वच्छ कि वर उभं राहूनच खाली पाण्यात असलेले सगळे मासे, प्रवाळ सगळं काही स्पष्टपणे दिसू शकतं. 

त्या बेटावर एक सुंदर रिसॉर्ट बनवला होता. बऱ्याच प्रकारच्या कॉटेज होत्या. एक छोटेखानी स्विमिंग पूल होता. (चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या बेटावर स्विमिंग पूल! :D). रेस्टॉरन्ट, क्लब हाउस अशा सर्व सुविधा होत्या. पिकनिक करायला हि खूपच सुरेख जागा आहे. आणि असे बरेच ग्रुप तिथे मुक्कामाला आलेले होते. गाणी गात, वेगवेगळे गेम्स खेळत मजा करत होते.

मी साधारण २०-२५ मिनिटात पूर्ण बेटावर फोटो काढत भटकून आलो. मग मी स्कुबा डायव्हिंगच्या डेस्कवर गेलो. तिथे परत एकदा निराशा झाली. या बेटावर स्कुबा डायव्हिंगची सुविधा होती खरी पण फक्त परवाना असलेल्या प्रशिक्षित लोकांसाठी. तिथे सेपासारखा ट्रेनर उपलब्ध नसल्याने नवशिक्या लोकांना डायव्हिंग करण्यास मनाई होती. शेवटी मला स्नोर्केलिंगच करावं लागलं. 

ते पण छानच असतं पण मी ते भारतात या आधीपण केलेलं आहे. म्हणून मला स्कुबा डायव्हिंगबद्दल जास्त उत्सुकता होती. ते न करता आल्यामुळे थोडं वाईट वाटलं. ज्यांना यातला फरक माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. स्कुबा डायव्हिंग म्हणजे पाण्यात खोलवर जाउन समुद्रातल्या गोष्टी बघणे. स्नोर्केलिंगमध्येसुद्धा हेच करायचं असतं पण वर वर, पाण्यावर तरंगत. एक मास्क मिळतो तो घालून पाण्यात सगळं बघता येतं. पण वरवर जेवढं काही दिसेल तेवढंच. स्कुबा डायव्हिंगमध्ये खोलवर जाता येतं त्यामुळे जास्त विविधता पाहायला मिळते. 

एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे स्नोर्केलिंगला वेळेची काही मर्यादा नव्हती. मी एक वेट सुट भाड्याने घेतला. तो सुट घालून मी जसा फिट (!) दिसत होतो ते पाहून मला एकदम छान वाटलं. आणि वेळेचं बंधन नसल्यामुळे अगदी मनसोक्त पाण्यात डुंबून आलो. थोडा वेळ पाण्यात थोडा वेळ बाहेर असा टाइमपास केला. पाण्याखालचं दृश्य अर्थातच खूप सुंदर होतं. चित्रविचित्र आकाराचे आणि अनेक रंगाचे प्रवाळ. तितकीच विविधता माश्यांच्या प्रकारांमध्येसुद्धा होती. माश्यांच्या झुंडी आपल्या अगदी जवळून जाताना एकदम शहारून येत होतं. आपल्याला कधी न दिसणारी आणि जाणवणारी इतकी अद्भुत सृष्टी पाहून जाणवायला होतं कि देवाने इतकं सुंदर आणि गहन असलेलं विश्व बनवलंय. असं वाटतं कि माणसाने कितीही शोध लावले आणि माहिती मिळवली तरी या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला न कळणाऱ्या पुष्कळ गोष्टी शिल्लकच असतील. 

या ट्रीपमध्ये काढलेले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा. एकट्याने जाण्याचा एक तोटा म्हणजे आपले फोटोज काढायला कोणी नसते. मी असंच एकाला फोटो काढण्याची विनंती केली. त्याने पण अगदी हसून प्रतिसाद दिला, आणि दोन तीन फोटो काढले. पण सगळे बेकार. फोकस न करता. आणि तेव्हा उन असल्यामुळे मला स्क्रीनवर पाहून इतकं काही कळलं नाही. :( माझा या ट्रीपमध्ये एकुलता एक फोटो मी स्वतःच एका काचेमध्ये पाहून काढला. 

मी जेवण केलं आणि त्याच बोटीने परत जकार्ताला निघालो. कोणी सोबत आलं असतं तर चांगलं झालं असतं, पण तरी मी माझ्या परीने एकट्याने आनंद घेतला. :)

Thursday, July 24, 2014

जकार्ताच्या आठवणी : ४ : तमन मिनी इंडोनेशिया

जकार्तामधील माझ्या पहिल्या रविवारी मी तमन मिनी इंडोनेशिया नावाची एक भन्नाट जागा पाहिली. तमन म्हणजे पार्क. तर या नावावरूनच या जागी काय असेल याची कल्पना येते. इंडोनेशियाची लहान स्वरूपातील प्रतिकृती. विचार करा, अक्ख्या देशाची प्रतिकृती. 


२५० एकर जागेत पसरलेला हा अवाढव्य थीम पार्क म्हणजे नियोजनबद्ध कामाचा एक उत्तम नमुना आहे. देशाची प्रतिकृती म्हणजे डोंगर नद्या वगैरे नाही. तर देशाची संस्कृती, इतिहास, वेगवेगळ्या भागातील परंपरा, जीवनशैली दर्शविणारे कार्यक्रम, शिल्पे, धार्मिक स्थळे, म्युझियम्स, अशा अनेक गोष्टींनी भरलेला तो पार्क होता. 


मी मागील पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, माझी राहुलशी हॉटेलच्या लिफ्टमध्ये ओळख झाली आणि आम्ही तमन मिनीला (या जागेचं संक्षिप्त नाव) जाण्याचा प्लान बनवला. आम्ही एक टॅक्सी करून सकाळी निघालो. आम्हाला तिथे पोचायला ४०-४५ मिनिटे लागली. तिथे पोचताक्षणीच आम्ही ह्या पार्कच्या भव्यतेने स्तिमित झालो.  

प्रवेशद्वारातच "मोनास" (मॉन्युमेंट चा इंडोनेशियन अपभ्रंश) या इंडोनेशियाच्या मुख्य स्मारकाची लहान प्रतिकृती आहे. जसे अमेरिकेत स्टेच्यु ऑफ लिबर्टी, भारतात कुतुबमिनार किंवा अशोकस्तंभाचे जसे महत्व आहे, तसे या मोनासला इंडोनेशियामध्ये महत्वाचे स्थान आहे. 

तिथे पिकनिकसाठी आलेले अनेक ग्रुप आणि परिवार आम्हाला दिसले. इतकी मोठी जागा असल्यामुळे एक दिवस घालवायला खूपच चांगली आहे. आम्ही तिथे माहितीकक्ष शोधत होतो, पण तिथे कोणीच नव्हते. आणि रस्त्यात भेटलेल्या लोकांना इंग्लिश कळत नव्हते. एवढ्या साऱ्या पर्यायांमधून काय काय आम्हाला बघावं ते समजत नव्हतं. थोडी माहिती मिळाली असती तर काय जरूर बघावं आणि काय सोडलं तरी चालेल ते सहज ठरवता आलं असतं. 

आम्हाला एक मोनोरेलचं स्टेशन दिसलं. हि ट्रेन अक्ख्या पार्कमध्ये चक्कर मारून आणते. काही ठिकाणी थांबेसुद्धा आहेत. म्हणजे पायी फिरणारे लोक हिचा वापर करू शकतील. याचसाठी एक रोपवेपण उपलब्ध आहे. पण तो जरा स्लो वाटला. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि साधारण २० मिनिटात पूर्ण पार्कला चक्कर मारून परत पहिल्या ठिकाणी आलो. तो पार्क खरच भव्य आणि जबरदस्त होता. आपल्याकडे एका ठिकाणी एक म्युझियम, किंवा एक प्राणीसंग्रहालय अशी आकर्षणे असतात. एकमेकांपासून दूर. इथे विविध प्रकारची उत्कृष्ट दर्जाची संग्रहालये, सर्व धर्माची मंदिरे, इंडोनेशियातील प्रत्येक विभागाची शैली दर्शविणारी घरे इ. सर्व काही एकाच परिसरात होते. आम्ही आम्हाला बघण्यात रस वाटेल अशी काही ठिकाणे हेरली. आणि तिथे फिरण्यासाठी एक स्कूटर ४ तासांसाठी भाड्याने घेतली. 

या पार्कमधील सर्वच गोष्टी पहायच्या म्हटलं तर २-३ दिवस तरी लागतील. जर तुम्ही एकच दिवस घालविण्यास आला असाल तर मग चोखंदळपणे निवड करणे भाग आहे. 

आम्ही पार्कमधून स्कूटरवर फिरायला लागलो आणि जे इंटरेस्टिंग वाटेल तिथे थांबून पाहायला सुरुवात केली. रस्त्यात आम्हाला इंडोनेशियन शैलीच्या बऱ्याच इमारती दिसल्या. आणि समोरच एक पक्षीसंग्रहालय दिसले. 

ते पक्षीसंग्रहालयसुद्धा पुष्कळ मोठे होते. बराच मोठा भाग त्यांनी वरून जाळ्या लावून बंदिस्त केला होता. पण त्या जाळ्या बऱ्याच उंचावर असल्यामुळे संकुचित पिंजऱ्यामध्ये असल्यासारखं वाटत नव्हतं. आणि आतमध्ये विविध प्रकारचे पक्षी अगदी मोकळे बागडताना दिसतात. काही न माणसाळलेले पक्षी पिंजऱ्यात होते. पण बहुतांश पक्षी मोकळेच होते. काही पाळलेले पक्षी आणि त्यांचा ट्रेनर अशे २-३ ठिकाणी उभे होते. या पक्ष्यांसोबत, त्यांना हातावर किंवा खांद्यावर घेऊन फोटो काढता येतो. अर्थात थोडी फी देऊन. 


माझ्या बायकोने नुकताच मला एक DSLR कॅमेरा भेट म्हणून दिला होता. त्यामुळे ह्या पक्ष्यांचे फोटो काढून मला खूपच आनंद मिळाला. पक्ष्यांचे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानंतर आम्ही एका उद्यानात गेलो. तिथे सुंदर तळे, डेरेदार झाडे आणि करड्या संगमरवरी दगडात साकारलेल्या अनेक सुंदर शिल्पकृती होत्या. एका गोलाकार खुल्या कक्षात असेच संगमरवरी प्राण्यांचे पुतळे होते. त्यांचे हावभाव खूपच सुंदर टिपले होते. त्यांच्या अल्बमला मी गंमतीने तमन रॉक झु असे नाव दिले आहे. तो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मी इथेच थोडी खरेदीपण केली. काही लाकडी खेळणी, काही स्मृतीचिन्हे व भेटवस्तू घेतल्या. नंतर मला समजले कि जकार्ताजवळ अशा प्रकारच्या वस्तू घेण्यासाठी तमन मिनी हीच सर्वोत्तम जागा आहे. 

त्यानंतर आम्ही एका वाहनांच्या म्युझियमला भेट दिली. या म्युझियममध्ये बऱ्याच प्रकारच्या वाहनांचा आणि ज्याला आपण व्हिंटेज म्हणतो अशा कार्सचा समावेश होता. तिथे हेलिकॉप्टर, विमान, ट्रेन अशा प्रकारची मोठी वाहनेसुद्धा होती. या संग्रहातले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा


आणि सर्वात शेवटी आम्ही एक मत्स्यालय पाहिलं. ते मात्र बाकी कुठल्याही मत्सालयासारखंच होतं. तिथली एकमात्र विशेष गोष्ट म्हणजे तिथली दोन प्रकारची कासवे. एक म्हणजे स्वच्छ पांढऱ्या रंगाचे कासव. आणि दुसरी अगदी लहान आकाराची कासवे, जी छोट्या पाण्याच्या बरण्यांमध्ये विक्रीला सुद्धा ठेवली होती. अगदी बारीक पांढऱ्या रंगाचे उंदीर सुद्धा विक्रीला होते. मत्स्यालयातील फोटोज पाहण्याकरिता इथे क्लिक करा



याखेरीज आधी सांगितल्याप्रमाणे रस्त्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या. अशा पार्कमध्ये इकडे तिकडे पाहिलेल्या पण तितक्याच सुंदर गोष्टींचे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा


त्या दिवशी फारच उन होतं आणि उकाडा पण खूप होता. काही केल्या घाम थांबत नव्हता. आमच्या स्कूटरची वेळ पण संपत आली होती, आणि आमच्यातही अजून फिरण्यासाठी त्राण नव्हतं. आम्ही स्कूटर परत करून हॉटेलकडे निघालो. सगळा पार्क काही आम्हाला पाहता आला नव्हता. पण आम्ही जेवढं काही येथे पाहू शकलो ते सुद्धा खूपच छान होतं.

जकार्ताच्या आठवणी : ३ : सुरुवातीचे दिवस

मी जकार्ताच्या आमच्या ऑफिसमध्ये रुजू झालो आणि काम सुरु केले. मी कामाचा तपशील तुम्हाला सांगत बसणार नाही. कारण, तुम्हाला तांत्रिक संज्ञांमध्ये विशेष रस असणार नाही, आणि त्याने काही फरकहि पडणार नाही. आणि काही कमीअधिक फरक सोडले तर सर्व आयटी कंपन्यामधले काम सारखेच असते. मी तुम्हाला मुख्यत्वे इथले लोक, जकार्ताभोवतीची मी पाहिलेली ठिकाणे याबद्दल सांगेन. 

माझ्या कंपनीचे इंडोनेशियामध्ये काही क्लायंट आहेत, आणि म्हणून त्यांनी तेथे एक ऑफिस उघडले आहे. या ऑफीसात काही स्थानिक इंडोनेशियन्स, काही स्थलांतरित भारतीय, आणि काही थोड्या कालावधीसाठी आलेले माझ्यासारखे काही लोक असे संमिश्र कर्मचारी आहेत. एका क्लायंटचे त्याच इमारतीत ऑफिस आहे. आता इथल्या इमारतींबद्दल एक विचित्र गोष्ट म्हणजे इथल्या मजल्याचे क्रमांक. येथे लोक संख्येबद्दल अंधश्रध्दाळू आहेत. त्यांनी इमारतीमध्ये मजला क्रमांक 13 अशुभ असल्यामुळे ठेवलेलाच नाही. 12 व्या मजला केल्यानंतर, आपण थेट 14 व्या मजल्यावर पोहोचतो. :D आणि माझ्या ऑफिसच्या इमारतीतील लिफ्ट मध्ये 4 थ्या मजल्याला 3 ए असे लिहिले होते. 

मी माझ्या मागील पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे इंडोनेशियन लोक हे अगदी हसतमुख आणि प्रसन्न लोक आहेत. ते दिवसभर गप्पा मारत राहतात, मोठमोठ्याने हसत राहतात. आणि ऑफिसमध्ये दिवसभरातून किमान एकदातरी त्यांचे इतके विचित्र आवाज ऐकू येतात कि नेमकं त्यांना काय व्यक्त करायचं आहे हेच कळत नाही. जेवढे लोक मी पाहिले त्यातले बहुतांश लोक मनमिळावू, आणि मदतीस तत्पर असे लोक होते. मग ते माझ्या ऑफिसमधले सहकारी असोत कि रिसेप्शनिस्ट. बँकेचे चपराशी असोत वा रखवालदार. सर्वच प्रकारच्या लोकांकडून मला असाच अनुभव आला. काही अपवाद होते खरे, पण विरळा. आणि हे आम्ही तिथे परदेशी दिसत असल्यामुळेच नाही तर मी जेवढं पाहिलं त्यानुसार ते एकमेकांशीसुद्धा असेच वागत होते. 

इथले लोक फुटबॉलबद्दल वेडे आहेत, आणि माझ्या ऑफिसमधले काही भारतीय सहकारीसुद्धा तसेच होते. फिफा वर्ल्डकप जवळ येत असल्यामुळे माझ्या आजूबाजूला कायम फुटबॉलसंबंधी चर्चा ऐकू यायची. प्रत्येकजण तो कोणत्या टीमला सपोर्ट करत आहे त्या टीमबद्दल उत्साहाने बोलायचा. कोणती टीम जिंकणार यावरून तावातावाने वाद व्हायचे. त्या लोकांनी यावरून पैजापण लावून ठेवल्या होत्या. माझ्या ऑफिसमधल्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळे फुटसॉल खेळायला गेलो होतो. फुटसॉल म्हणजे फुटबॉलचंच छोटं स्वरूप. बंदिस्त आणि छोट्या आकाराच्या मैदानात, अगदी तासभरच चालणारा गेम. आम्हाला तिथे खेळून खूप मजा आली. आयटीवाले असल्यामुळे सगळेजण तासभर पळत पळत खेळू शकले यामध्येच समाधानी होते. 

इथे शुक्रवारी एक स्ट्रीट मार्केट भरते. भारतातील अनेक शहरे आणि गावांमधिल साप्ताहिक बाझारांसारखे, हे फक्त शुक्रवारी असते. या मार्केटची जागा माझ्या ऑफिसपासून जवळ आहे. माझा एक सहकारी, तेथे मला घेऊन गेला. इथल्या लोकांची फुटबॉलची आवड इथेपण दिसून आली. सर्वात जास्त गर्दी असलेले दोन स्टॉल्स फक्त फुटबॉल जर्सीज आणि फुटबॉलसंबंधित वस्तू विकत होते. त्याव्यतिरिक्त बाकी छोटी हत्यारे, गृहोपयोगी साधने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, DVDs इ. विविध गोष्टी विकणारे बरेच स्टॉल्स होते.

ऑफिसमध्ये माझ्या पहिल्या दिवशी, साधारण चहाच्या वेळी मी माझ्या लॅपटॉपवर काम करत होतो.  अचानक लोक पळायला लागले आणि एक मोठा आवाज झाला. पळतपळत सगळे कोपऱ्यात एका डेस्कभोवती जमले. त्या आवाजाच्या जोडीला जे बसले होते ते पण जमिनीवर पाय आपटून आवाज करत होते. मी आधी त्या आवाजामुळे आश्चर्यचकित झालो होतो. पण बाकी प्रत्येकजण हसत असलेले पाहिले. त्या डेस्कवरून लोक परत पांगले तेव्हा प्रत्येकाच्या हातात काही फळे किंवा चॉकलेट दिसत होते. आणि नंतर ते सगळं संध्याकाळच्या अल्पोपहाराच्या पदार्थांसाठी होते हे समजले. इथे दिवसातून दोनदा, काही चॉकलेट किंवा काही अल्पोपहाराचे पदार्थ सोबत काही फळे सर्वांना पुरवण्याची पद्धत आहे. आणि या लोकांनी याचा एक गेम बनवून ठेवलाय. जे पळत आधी पोहोचतील तेच सगळं काही उचलून घेतात. शेवटच्यासाठी काहीही उरत नाही.

थोडे किंवा काही काम नसताना, किंवा ब्रेकच्या वेळी ते लोक चक्क ऑफिसमध्ये काउंटर स्ट्राइकसारखे गेम खेळतात. काही कारणास्तव एकदा मी तेथे एकजणाला भेटायला क्लायंटच्या ऑफिसमध्ये गेलो, आणि पाहिलं तर ते लोक पद्धतशीरपणे गेमिंग कन्सोल त्यांच्या वर्कस्टेशनवर जोडून फिफावाला गेम खेळत होते. पण हे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये प्रचलित आहे. भारतातील अनेक कंपन्यामात्र सोशल मीडियावर बंदी घालतात, अगदी पत्त्यांचे गेमसुद्धा सिस्टममध्ये ठेवत नाहीत. आपल्या ऑफिसमध्येसुद्धा अशा प्रकारचे स्वातंत्र्य असलेले मला आवडेल.  पण हे सगळं चालू दिलं तर आपण काम करू का हा प्रश्न आहे. :D

मी थोडीशी बहासा म्हणजे इथली स्थानिक भाषा  शिकलो. (बहासा शब्द हा संस्कृतमधील भाषा या शब्दासारखाच आहे). धन्यवादला इथे "तेरीमा कसिह" असं म्हणतात. दुधाला "सुसु" म्हणतात. :D इंडोनेशियन्स श्री. किंवा सर सारखे, आदर दर्शविण्यासाठी एकमेकांना मास किंवा पाक म्हणून संबोधतात. आणि ते हीच संबोधने मेल्समध्येसुद्धा अनेकदा वापरतात.

पहिला वीकेंड जवळ येत होता, मी जकार्ता आणि अवतीभवती असलेलि प्रेक्षणीय ठिकाणे पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण अडचण म्हणजे माझ्यासोबत जायला कोणी नव्हते. मी माझ्या ऑफिसमधून जकार्ताला जाणारा शेवटचा होतो. बाकी सर्वजण तेथे आधीच गेलेले असल्यामुळे त्यांनी जवळपास सारी ठिकाणे आधीच पाहिली होती. त्यापैकी काहीजणांची तर इथे सहावी सातवी ट्रिप होती. मी आधी कुठे जाऊ मला कळत नव्हतं. 

आम्हाला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागलं. त्यामुळे शनिवारी मी उशिरापर्यंत झोपा काढल्या. तो दिवस अर्धा झोपेमुळे आणि उरलेला पावसामुळे वाया गेला. संध्याकाळी सोबत कोणी नव्हतंच. मी एकटाच माझा कॅमेरा घेतला आणि कुनिंगान म्हणजे जिथे मी राहत होतो तो भाग, तिथे आसपास फोटो काढत भटकून आलो. 

कुनिंगान मध्ये मी संध्याकाळी भटकत काढलेले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मी भटकून परत हॉटेलमध्ये आलो आणि मला लिफ्टमध्ये ऑफिसमधला एकजण भेटला. आम्ही एकमेकांना नावाने ओळखत नव्हतो पण ऑफिसमध्ये पाहिलेलं असल्यामुळे आम्ही ओळखीची स्माईल दिली. मी सहज विचारून बघावं म्हणून त्याला उद्या कुठे जवळपास साईट सीईंगला यायला आवडेल का असं विचारलं. आणि तो चक्क हो म्हणाला. माझा मजला आला होता, बाहेर येण्याआधी आम्ही पटापट एकमेकांचे नाव आणि नंबरची देवाणघेवाण केली. आणि मी रूममध्ये परत आलो तेव्हा माझ्याकडे उद्यासाठी सोबत आणि प्लान दोन्ही होते. :)

Wednesday, July 23, 2014

जकार्ताच्या आठवणी : २ : प्रथम दर्शनी

मी मलेशियन एअरलाईन्सच्या विमानामध्ये मुंबईहून जकार्ताला निघालो. या विमान कंपनीच्या एमएच 370 विमानाच्या आताच्या घटनेमुळे बरेच लोक या नावाला घाबरतात. अनेकजणांनी मला इशारा दिला. मीसुद्धा सतर्क होतोच. पण शेवटी अशा घटना घडत राहतात, म्हणून आपण काही त्या गोष्टी करणे थांबवू शकत नाही. मुंबईमध्ये सीएसटीवर हल्ला झाला होता, पण लोक तेथे जाणे थांबवू शकत नाहीत, पुण्यातसुद्धा जेएम/एफसी रोडवर हल्ला झाला होता, आणि अजूनही ती वर्दळीची आणि लोकप्रिय खरेदीची ठिकाणे आहेत. एमएच 370 तर अजूनही एक गूढ आहे. सुदैवाने, माझा पुढचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होता.

माझे पहिले विमान मध्यरात्री मुंबई ते क्वालालंपूर असे होते. मी थोडा वेळ झोपलो. रात्रीचं खिडकीबाहेर पाहण्यासारखं काही नव्हतं. थोडा वेळ लॉर्ड ऑफ दि रिंग्स हा सिनेमा पाहिला. सुदैवाने मी सूर्य उगवतेवेळी जागा होतो, आणि तो विलक्षण होता. अशा उंचीवरून सूर्योदय पाहणे हा एक आयुष्यभरासाठीचा संस्मरणीय अनुभव आहे.

दुसरे विमान पहाटे क्वालालंपूरपासून जकार्तापर्यंत होते. हा थोडा जवळचा प्रवास होता. मी माझ्या खिडकीतून निसर्गरम्य देखावे बघत संपूर्ण जागा होतो. एकदा विमान समुद्रावर होते, आणि तिरपे झुकलेले होते, आणि खाली फक्त पाणी दिसत होते. क्षितीजरेषा जवळपास अदृश्य झाली होती. निळे आकाश आणि समुद्र एकमेकांमध्ये विलीन झालंय असं वाटत होतं. फक्त एक बोट, किंवा एक मोठं जहाज देखील असू शकेल बरीच दूर चालेली दिसत होती. मी हा सुंदर देखावा कधीच विसरणार नाही.

मी जकार्ता मध्ये उतरलो आणि इमिग्रेशन आणि सीमाशुल्क तपासणीसाठी गेलो. इमिग्रेशनवाल्या माणसाने इतर प्रवाश्यांपेक्षापेक्षा माझ्याबाबतीत प्रक्रिया करण्यासाठी थोडा जास्त वेळ घेतला.  बहुतेक प्रत्येक प्रवासी असाच विचार करत असेल. मी डॉलर्स इंडोनेशियन रुपियाहमध्ये बदलून घेतले आणि बाहेर आलो. मी हॉटेलला जाण्यासाठी एक टॅक्सी केली. टॅक्सीचालक अतिशय आनंदी आणि बडबड्या स्वभावाचा व्यक्ती होता. मला असाच अनुभव सगळीकडे आला. सर्वसाधारणपणे इंडोनेशियन्स आनंदी हसतमुख आणि सहज मैत्री करणारे लोक आहेत.

भरपूर शतकांपूर्वी इंडोनेशियामध्ये मुख्यतः हिंदू लोक होते, असे मी इतिहासात कुठेतरी वाचले होते. कालांतराने येथील बऱ्याचशा लोकांनी इस्लाममध्ये धर्मांतर केले. पण बाली बेटासारख्या ठिकाणी अजूनही काही हिंदू आहेत. संस्कृत, हिंदू संस्कृतीचा प्रभाव अजूनही त्यांची भाषा, आणि हावभाव यात दिसून येतो. भारतीय लोकांसारखे इंडोनेशियन्स देखील त्यांचे हात जोडून नमस्कार करतात. मुलासाठी पुत्र आणि मुलीसाठी पुत्री असे शब्द अगदी संस्कृत सारखे आहेत.

चालकाचं नाव होतं गुणवान. शुद्ध संस्कृत नाव. त्याने लगेच ओळखलं कि मी भारतातून आलेलो आहे आणि बडबड सुरु केली. आपलं भारताविषयीचं ज्ञान दाखवायला लागला. अर्थात हे ज्ञान फक्त बॉलीवूड आणि टीव्ही सिरिअल्सपुरतं मर्यादित होतं. :D त्यांच्या लहेजामध्ये तो महाभारताला माबारत, भीमाला बिमा, युधिष्ठीरला उदिष्टीर अशी नावं घ्यायला लागला. काही मोजकीच भारतीय टीव्ही चॅनेल इथे दाखवतात, आणि त्यातल्या एकावर महाभारत (नवीन) चालू असतं. ते इथे बरंच लोकप्रिय आहे. इंडोनेशियाच्या पारंपारिक रंगभूमीवर फार आधीपासून रामायण महाभारताचे प्रयोग होत असल्यामुळे त्यांना हे देखील आवडतं. मग त्याने बॉलीवुडविषयी बोलण्यास सुरु केलं. शारूक कान (शाहरुख खान) इथे अति लोकप्रिय आहे. त्याचा कुची कुची ओता ऐ (कुछ कुछ होता है) इथे बहुतेक सर्वांनी पाहिला असेल. 

पुढे जेव्हा मी इंडोनेशियाच्या रस्त्यांवरून बाजारातून फिरायला लागलो तेव्हा मला कमीत कमी दोन-चारदा शाहरुखची गाणी ऐकायला मिळाली. पायरेटेड डीव्हीडीच्या दुकानामध्ये महाभारत सिरिअलची, शाहरुख आणि काही भारतीय सिनेमांची डीव्हीडी देखील बघायला मिळायची. 

जकार्ताचं विमानतळ शहराच्या थोडं बाहेर आहे. आम्ही विमानतळाचा परिसर सोडताच आम्हाला खूप ट्राफिक लागलं. गुणवान मला सांगत होता कि जवळपास नेहमीच असंच ट्राफिक असतं. त्याने मला परत निघायचं असेल तेव्हा खबरदारी म्हणून हॉटेल मधून २ तास आधीच निघायला सांगितलं. माझं हॉटेल सोमरसेट विमानतळापासून ३५-४० कि.मी. दूर होतं. आणि आम्हाला पोचायला दोन तास लागले. 

त्याच्याशी बोलता बोलता मी बाहेर रस्ते, पूल, गाड्या, इमारती वगैरे बघत होतो. फोटो काढत होतो. जकार्तामधल्या पायाभूत सुविधा खूपच छान वाटल्या. मोठमोठे पूल, चार पदरी रस्ते, भव्य इमारती, तिथल्या उच्च तंत्रज्ञानाची ग्वाही देत होते. पण हे सगळं असूनसुद्धा आम्ही ट्राफिकमध्ये अडकलो होतो. 

गुणवानकडून, किंवा माझ्या जकार्ताबद्दलच्या वाचनातून, आणखी लोकांकडून मला जे समजलं ते असं कि, जकार्ता हीच इंडोनेशियाची मुंबई आणि दिल्ली दोन्ही म्हणजेच राजकीय, औद्योगिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथेच भरपूर लोकसंख्या केंद्रित झालेली आहे. आणि त्यात मुंबईप्रमाणेच नित्य नवीन लोकांची भर पडत राहते. त्यामुळेच इतक्या सुविधा निर्माण करूनसुद्धा वाढत्या लोकसंख्येला अपुऱ्या पडत आहेत. या सततच्या ट्राफिकचे हेच कारण आहे. 

रस्त्यावरून जाताना मला बरेच मॉल दिसले, मोठ्या ब्रँडची दुकाने, फूड चेन्स, रिटेल चेन्स दिसल्या. आणि जेव्हा चालकाने टॅक्सी शॉर्टकटसाठी लहान गल्ल्यांमधून नेली तेव्हा आपल्यासारख्याच चहाच्या टपऱ्या, छोटे खाद्यपदार्थांचे गाडे दिसले. आणि बरेच लोक चहा-सुट्टाचा ब्रेक घ्यायला आलेले होते. 

हॉटेलला जाईपर्यंत रस्त्यावर मी काढलेले काही फोटोज पाहण्याकरता इथे क्लिक करा

मी दुपारच्या जेवण्याच्या वेळी हॉटेलला पोहोचलो, आणि माझ्या रूममध्ये चेक इन केलं. रूम काय, तो खरं तर एक १ BHK फ्लॅटच होता. एक सुसज्ज स्वयंपाक घर होतं. माझ्यासारखे भारतीय आपल्या भारतीय अन्नापासून फार काळ लांब राहू शकत नाहीत. आणि बाहेर जर भारतीय अन्न हवं असेल तर स्वतःलाच बनवून घ्यावं लागतं. त्यामुळे अशा सोयींची मला गरजच होती. माझी रूम पाहून माझ्या जीवात जीव आला. आता प्रवास संपला होता. माझं ऑफिस माझी वाट पाहत होतं.

Tuesday, July 22, 2014

जकार्ताच्या आठवणी : १ : तयारी

माझी सध्याची कंपनी अ‍ॅमडॉक्सच्या कृपेने मला माझ्या पहिल्या विदेश दौऱ्याची संधी मिळाली. प्रोजेक्टच्या काही कामासाठी मला इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे जवळपास एक महिना जाण्यासाठी विचारलं होतं. अर्थात, मी क्षणभरही उशीर न करता होकार दिला. 

माझ्या अशा संधींच्या गतेतिहासाप्रमाणेच हि संधीसुद्धा एका क्षणी गेल्यातच जमा होती. पण परत पारडं पालटलं आणि जाण्याचं नक्की झालं. याआधी माझ्या आधीच्या कंपनीमध्ये मी चीनला एक वर्षासाठी जाणार होतो. माझं वर्क परमिटसुद्धा बनलं होतं. पण ऐनवेळी आमच्या कस्टमरने तो प्लान रद्द केला आणि माझी संधी हुकली. याशिवाय सुद्धा आधीच्या आणि आताच्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या वेळी अशा ऑन साईट ट्रीपसाठी विचारणा झाली होती, पण कधी विसाच्या अटी तर कधी कंपनीच्या नियमांमुळे आणि अशा कैक कारणांमुळे ते जमलं नाही. 

चीनची गोष्ट तर इतकी पक्की झाली होती, आणि एक वर्षासाठी जाणार असल्यामुळे हि बातमी माझ्या दूरदूरच्या नातेवाईक आणि मित्रांमध्येपण पसरली होति. त्यामुळे हे जेव्हा रद्द झालं तेव्हा थोडी लाजिरवाणी स्थिती झाली होती. त्यामुळेच यावेळी जेव्हा मी विदेशी जाण्याची शक्यता होती, तेव्हा मी "शक्यतो" हा शब्द अगदी माझ्या निघण्याच्या दिवसापर्यंत वापरला. आणि त्या दिवशीसुद्धा कधीही माझ्या बॉसचा फोन येईल आणि तिकीट रद्द करून मला नेहमीप्रमाणे ऑफिसला यायला सांगेल अशी मी माझ्या मनाची तयारी ठेवली होति. 

माझा एक सहकारी आधीच जकार्ताला गेलेला होता, आणि मी त्याचीच जागा घ्यायला जाणार होतो. त्याने मला सगळी तयारी करायला बरीच मदत केली. तिकडचं अन्न आपल्याला मानवत नाही, तू घरूनच पूर्ण तयारीनिशी ये या त्याच्या सुचनेमुळे मी खाण्यापिण्याच्या बऱ्याच गोष्टींची खरेदी केली. एक महिना पुरेल एवढं सामान न्यायचं होतं. पण विमानामध्ये प्रती माणशी ३० कि. सामान निःशुल्क नेता येतं. त्यावर जर सामान झालं तर प्रत्येक विमान कंपनी वेगवेगळ्या पद्धतीने शुल्क आकारणी करते. त्यामुळे सर्व सामान त्या मर्यादेत बसवणे हे एक आव्हान होते. मी फक्त खरेदी केलेल्या खाण्याच्या गोष्टी भरल्या, आणि आमच्या साध्या वजनकाट्यावर वजन केलं. पण गंमत झाली ती अशी कि, ती बॅंग आडवी ठेवली तर २५ किलो आणि उभी ठेवली तर २२ किलो भरत होती. साहजिकच त्या वजनकाट्याचा सामानाचं वजन करण्यासाठी काही उपयोग नव्हता. 

मी अजून माझे कपडे, कॅमेरा, आणि बाकी काहीच भरलं नव्हतं तरी एवढं वजन झालं होतं. आणि त्यात भर म्हणजे माझ्या आईसाहेब आणि सासूबाई यांनी औरंगाबादहून आणखी काही खास टिकाऊ खाद्यपदार्थ बनवून माझ्या वहिनीसोबत पाठवले. वहिनीने ते माझ्या बायकोला तिच्या ऑफिसमध्ये नेउन दिले आणि तिचा तिथूनच फोन आला कि हे सामान सहज ७-८ किलो असेल. मी तिला सांगून टाकलं कि मी काही कपडे वगैरे नेतच नाही, फक्त खाद्यपदार्थच घेऊन जातो. :D 
सामानासाठी काहीतरी करावं लागणारच होतं. आम्ही पुन्हा सगळी बॅंग रिकामी केली. आधी घेतलेलं थोडं सामान कमी केलं. सगळ्याच गोष्टीचं प्रमाण थोडं कमी केलं. आधी माझे कपडे आणि बाकी सामान एका दुसऱ्या बॅंगमध्ये भरले होते. पण आम्हाला जेव्हा कळलं कि त्या बॅंगचंच वजन ३ किलो आहे तेव्हा ती बॅंग रिकामी करून सगळं सामान एकाच मोठ्या बॅंगमध्ये कसंबसं कोंबलं. 

आता खाण्याची आणि कपड्याची अशी ती एकच मोठ्ठी बॅंग होती. त्याशिवाय माझी लॅपटॉप बॅंग होती आणि आणखी काही बारीकसारीक सामान होतं. हे सगळं अजून एका छोट्या ऑफिस बॅंग मध्ये टाकलं. आणि शेवटी आमचं पॅकिंग संपलं. मग आम्ही जाऊन एक स्प्रिंग बॅंलंसिंग वाली स्केल आणली. तिची कमाल क्षमता होती ५० किलो. पुढेसुद्धा अशी बाहेर जाण्याची संधी मिळेलच तर उपयोगी पडेल अशा विचाराने आम्ही ती विकतच आणली. :)


जरी त्या स्केलची क्षमता ५० किलो होती तरी त्या स्केलला एवढी अवजड बॅंग लटकावून, स्केलच्या छोट्याश्या मेटालिक ग्रीपला पकडून उचलून धरणे खूप अवघड आहे. मी ते उचलून जितका वेळ जमेल तेवढं धरलं. ती बॅंग जवळपास २८ किलो भरली. आणि दुसरी छोटी ऑफिस बॅंग २-३ किलो. म्हणजे अगदीच काठोकाठ ३० किलो झालं होतं. 

मी आता पुन्हा पॅक करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. म्हणून मी आवश्यक असल्यास सामान शुल्क भरण्याची मनाची तयारी केली. माझी टँक्सी वेळेवर आली आणि मी मुंबईला रवाना झालो. साधारणपणे, पुणे मुंबई प्रवासाला 3-3.5 तास लागतात. पण कधी मोठ्या कंटेनरचा एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला, आणि काही तास रस्ता पूर्ण ब्लॉक होऊन जाईल ते तुम्हाला सांगता येत नाही. किंवा तुम्ही पटकन पनवेलला पोहोचूनसुद्धा नंतर विमानतळापर्यंत जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे मी खूपच लवकर पुण्याहून निघालो आणि वेळेच्या खूप आधी विमानतळावर पोहोचलो. 

माझी एक मैत्रीण विमानतळावर मला भेटण्यासाठी आली नसती तर मी विमानाचं बोर्डिंग होईपर्यंत खूप कंटाळलो असतो. आम्ही भरपूर वेळ गप्पा मारल्या आणि नंतर ती गेली. अशातच सुरु झालेलं मुंबई विमानतळ टर्मिनल 2 खूपच मस्त आहे. सर्व काही अगदी भव्यदिव्य, चकचकीत आणि नवल वाटावं इतकं सुंदर आहे. क्षणभर तुम्ही मुंबईमध्ये उभे आहात हेच विसरून जाल. :D 

चेक इनच्या रांगेत अर्धा एक तास प्रतीक्षा केल्यानंतर शेवटी मी माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानात बसलो, आणि जकार्ताकडे निघालो. :)

Friday, July 18, 2014

Jakarta Diaries : 9 : Return

We went to Bandung on Saturday, and Sunday was reserved for shopping, packing, as I had a flight on Monday. I did some shopping of small souvenirs, gifts for relatives, and friends, as this was my first trip abroad.

In India, although picture is changing pretty fast, but a trip abroad is still a special thing. My father went on a business trip to Japan, a few years ago, and it was big news. Some relatives who came to know about later, were furious on us asking why didn't you tell us before? 

Since I belong to IT industry, it was obvious that I would go on site some day or the other. But as they say in industry, first on site is always special. And I can say yes it is. I really enjoyed my time here. People in my office, who are used to travelling, now, could tell from my excitement that this was my first trip.

Work wise, I learnt a lot. I saw many new places and enjoyed it. Since I had to leave alone for one month, I had to cook for myself, and that enhanced my cooking ability.

Technology has made a lot of things very easy. Google alone has provided most of the useful applications. Google maps to navigate through places across the world. Google translate to communicate in many languages. You can download a specific language pack required, and run it offline. I don't know about the grammatical accuracy, but it came in handy while communicating and negotiating with the taxi drivers.

The basic Google functionality, to search about anything has revolutionized the world. I wonder how people have traveled and explored the world without these applications. I salute to both kind of people, those created these technologies, and those who survived without these.

Watching a lot of movies also helps in a way. You see scenes on airports, immigration checks, days in a foreign country, that there is readily developed sense of familiarity with all these things which otherwise scares people.

I returned via Kuala Lumpur again. My second flight from Kuala Lumpur to Mumbai was delayed by an hour. It was really boring hour in the waiting lounge. After taking off, the weather troubled us a lot. The thoughts about the missing Malaysian Airlines plane MH 370 were playing in everyone's mind.

As we were behind scheduled time, we had to circle around in Mumbai for some time, and I kept guessing the places visible from my window. After spending enough time in air, my flight finally landed in Mumbai, and I returned to my India. :) 

Jakarta Diaries : 8 : Bandung Volcano And Craters

My trip to Indonesia was almost over. I had a flight on Monday, and a last weekend to enjoy. We made a plan to visit the volcano site and craters in Bandung, a place around 140 kms from Jakarta.

For the first time, I did not have issue to find company to go on a trip. Two new people Ashish and Ankita joined our team in office, and they were happy to come along. So totally 4 of us, Ashish, Ankita, Meenakshi and me went for this memorable trip.

We enjoyed the journey as well as the places we visited. This time our driver was Gebe, another pleasant and funny Indonesian man. Initially he played some Indonesian songs, later we took out our mobiles and started playing Indian songs. Gebe, requested us to play his favorite Indian song, none other than Kuch Kuch Hota Hai.

Luckily, one of us had that in mobile, and we were able to fulfill his request. He was delighted, and expressed his pleasure with singing few lines from that song. He made few other requests too, but we could not make out which songs he was referring too.

Once the Indian songs started playing, it did not take us long to start singing ourselves. And we started the all time favorite pastime of Indians in trips.. The Antakshari. Because of this it did not feel like travelling in Indonesia. It was just like home. For the first time, the journey was as enjoyable as much as the destinations.

We were alternating between singing songs and playing them on mobiles. Gebe was enjoying too. He used to catch the repeated lines in songs, and sing it. It was fun. :)

But we were lost in the Indian music, and Indonesian roads. There was confusion between the place we asked to go, and the place he knew. We took a few wrong turns, spent around half an hour in this, and then we came to know that we both were referring to same place. :D Communication problems I tell you.


Finally we reached the first spot, a view of the volcanic mountains and lake from a distant hill. It was unique. Mountains created of a very different kind of stones and rocks, smoke coming out from many places, a lake with water or some other liquid of really strange color, and an odor like in chemical laboratory. 

It was not like the live volcano we see in movies. Obviously it is not safe and people will not be allowed to enter such live volcano. The volcano here erupted around 30 years ago.

You can go hiking on those mountains too. We climbed a bit, but didn't go far as we didn't have that much time.


The next spot was where you can actually walk through the mountains, spend some time around in hot water springs. To go to that site you have to walk for 20-30 minutes through beautiful forests. A local guide is compulsory here. We hired one, but rather than sharing information, he was more interested in exhibiting his knowledge of Hindi and learning some more from us.



On the way we saw many tall trees, one of which was more than 300 years old, the guide told us. The walk was really enjoyable and reminded me of the monsoon treks we do in India on many forts around.

Here, there are many hot water ponds, of varying temperature. Some are very hot, where you can boil eggs. The local people sell eggs here, obviously pretty costly than what you would pay in normal place. We too, bought few eggs and enjoyed boiled eggs from volcano.

In some ponds, you can dip your feet and relax for some time. According to guides, the sand here contains sulfur and is good for skin. Some people also provide massage with that solution. It is also available in bottle packs for sale. Ladies in my group were in two minds whether to apply on their face or not. They might have noticed the look on our faces, and decided to buy the bottle and try it at home.


We bought some wooden artwork in the stall nearby, and left for Jakarta. We had our lunch on the way. We were stuck in traffic, and it was pretty dark when we reached our hotel. Although the volcano wasn't as expected, the site was still a unique place, and the journey was definitely enjoyable. :)

Thursday, July 17, 2014

Jakarta Diaries : 7 : Taman Safari

Till now, I had spent 2 good weeks in Indonesia. Half of my trip was over. And also the major part of work was over. I was having a relaxed time in office, and it was time to have even more fun outside. The next spot in the wishlist was Taman Safari. It was a highly recommended spot from everyone in my office. And after visiting I saw why, and now even I would recommend this to everyone visiting Indonesia.


After Taman Mini Indonesia, Taman Safari (Taman means park), is another marvelous example of a planned mega theme park. This park is based on a large area around 400 acres. It has two main parts, the safari, and the other is the amusement park containing a baby zoo, animal shows, and few rides.

Like last time, I was prepared to go alone to Taman Safari also. But a colleague introduced me to Meenakshi. She was also new here, and looking for company to go to Taman Safari. She had one more friend Deepa, working for another client of my company. We three decided to go together. We hired on taxi for Sunday. 

Our driver Suja, was a pleasant and decent man. He came 10 minutes late than decided time, and apologized at lease thrice for this. We left for the park pretty early in the morning, as we were advised to avoid the traffic. 


The driver took us through a short cut he knew, and the hilly village we crossed, reminded me of Darjiling, which I visited few years ago. Similar narrow roads, tea gardens, scenery revived my memories of the beautiful Darjiling-Sikkim trip I had with my family.

We reached Taman Safari and paid for the entry ticket. And the first part of the park, the safari started. The safari means a ride through a large forest area, where variety of animals walks free in their designated area. You are not allowed to leave your vehicle, but you can drive slowly to observe the animals.


On the way to Taman Safari, we saw many stalls selling fresh carrots. We did not buy, but after the safari started, we realized its purpose. Those carrots were to feed the animals in Safari. Many animals like zebras, camels, monkeys, come near the passing vehicles in hope of those carrots.




The Safari was just amazing. I saw many animals like giraffes, zebras, hippo for the first time, and that too walking free. I have seen lions and tigers in India before, but not like this. They are mostly locked inside the cage, and you are allowed to see them from the other side. 

This was the golden chance to use my camera, and I did it. I was really very happy to click pictures of such wild animals from so close. I was very very happy that day. According to me, this was the best day of my trip to Indonesia. I wasn't stopping clicking for a moment. I took hundreds of pictures.


Now, this is not the real wild life photography. These animals although not caged, are controlled in some manner. But this arrangement was the best possible solution between the typical zoo, and the real wild life.

In a real forest, to catch a sight of any wild animal is completely on your luck that day. Photographers say that you might not get a chance to see any tiger/lion even after 2-3 safaris sometimes. And in a conventional zoo, the animals look really bored in the cage. Here, there is certainty of seeing those animals which are free, and yet controlled, but in a near to natural habitat.

I was impressed with the Safari, and wished that we must have such place in India. This was my first time to click animals this way, and waiting for an opportunity to go for real wild life photography as well. Click here to have a look on the pictures from Safari.

The safari ended after around 2 hrs. And we reached the amusement park inside. This was like any other amusement park having few rides, 4D movie theater, food stalls and performances. The special thing about the park was the penguins, and the Komodo Dragon (which did not look like the dragon we see in movies). 


A baby zoo was also there having many civilized pet animals, like tiger, lion, snakes, monkey. For a small fees, you can click a picture with those animals too. I clicked a picture with a lion, and even though he was chained and trainer was around, it was scary. :D

Click here for the pictures of the Fun Park and Baby Zoo.

The park had many performances and shows. We watched sea lion show, dolphin show, cowboy show, bike stunts, and in the end tiger show. Here are the pictures of tiger show.

The Safari really made my day. I was very happy to visit this place. If you ever visit Jakarta, and have enough time, do not miss this place. :)