Wednesday, July 27, 2022

क्रिएट, पब्लिश अँड फरगेट

असं म्हणतात कि "नेकी कर दरियामे डाल". चांगलं काम करा आणि विसरून जा. 

तसं आज काल जे कन्टेन्ट क्रिएटर असतात, त्यांच्यासाठी एक म्हणता येईल, "क्रिएट, पब्लिश अँड फरगेट"

ज्यांना लिहिण्याची, गाण्याची, काही सादर करण्याची, व्हिडीओ बनवण्याची आवड आहे, त्यांना ह्या गोष्टीतुन आनंद मिळतो. हल्ली इतके लोक इंटरनेटवरून मोठे झाले, त्यामुळे अनेकांना वाटतं आपणही काही तरी करून पाहावं. काही बनवुन पाहावं. 

आणि काही बनवलं कि साहजिकच ते लोकांसमोर नेण्याची उत्कंठा असते, त्यांच्याकडून काही प्रतिसादाची अपेक्षा असते. 

संगीत हि कला अशी आहे, जी आपण स्वतःसाठी सादर करू शकतो, स्वतःपुरता आनंद घेऊ शकतो. कोणी समोर नसलं तरी चालतं. 

पण ह्या इतर कला हा एक प्रकारे संवाद असतो. आपल्याला आलेले अनुभव, आपले विचार, हे लेख, कविता, ब्लॉग, वलॉग, वर्तमानपत्र, साप्ताहिक अशा कुठल्या तरी स्वरूपात मांडून आपण आपल्या वाचकांशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधु पाहतो. त्या अनुभवावर काही तरी चर्चा व्हावी अशी एक सुप्त अपेक्षा असते. 

इंटरनेटवर इतका सगळा कन्टेन्ट उपलब्ध असल्यामुळे लोकांचा अटेन्शन स्पॅन फार कमी झाला आहे. एका परिच्छेदापेक्षा मोठ्या पोस्ट, एका मिनिटापेक्षा मोठा व्हिडीओ बहुतांश लोक पाहत नाहीत. 

त्यामुळे साहजिकच कन्टेन्ट बनवणाऱ्यांचा हिरमोड होतो. ज्यांची हौस पहिल्या काही दिवसात फिटते असे मग माघारी फिरतात. 

मित्रांनो, कला क्षेत्र असंच आहे. छापल्या गेलेल्या लेखांपेक्षा, पुस्तकांपेक्षा संपादक आणि प्रकाशकांनी नाकारलेले लेखक कितीतरी जास्त आहेत. 

चित्रपट, मालिका, नाटके यामधुन समोर येणाऱ्या कलावंतांपेक्षा "स्ट्रगलर" किती तरी जास्त आहेत. 

फार ग्रो झालेल्या युट्युब चॅनेल्स आणि इन्स्टा हॅन्डल्सपेक्षा फारसे पुढे न गेलेल्या क्रिएटर्सची संख्या खुप जास्त आहे. 

काही जणांकडे पाहुन आपल्याला वाटतं, "अल्लाह मेहेरबान तो गधाभी पेहेलवान". मग आपल्याला का मिळु नये असं यश?

आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे कि अशा लोकांनी सुद्धा कुठल्यातरी प्रकारे अनेक लोकांची मने जिंकलेली असतात. त्या लोकांचं प्रेम त्यांना मिळतं. 

त्यामुळे फक्त यातुन काहीही करून फॉलोअर्स वाढवायचे आणि पैसे कमवायचे एवढाच उद्देश ठेवुन कन्टेन्ट बनवत असाल, तर तुमचा निर्णय तुम्ही घ्या. 

हि अत्यंत वेळखाऊ गोष्ट आहे. फावल्या वेळात होईलच असं नाही. 

पण जर तुम्हाला जे काही तुम्ही करताय त्यातुन खरंच आनंद मिळत असेल तर हे सोडु नका. जमेल तसं करत रहा. 

आपल्याला काहीतरी बनवायची कला आहे, हौस आहे, मग आपण त्याचा आनंद घ्यायचा. 

माझा स्वतःचा ब्लॉग फारसा मोठा नाही आणि युट्युब चॅनेल सुद्धा फारसं मोठं नाही. तरी मला आज हे पॉसिटीव्ह थॉट्स कुटून आले? 

मी माझ्या फिलिपिन्स आणि इस्राएलच्या बिझनेस ट्रिपमध्ये जेवढा वेळ मिळाला तेवढं फिरलो आणि त्यावर व्हिडीओ बनवले. २-३ वर्षांपूर्वी. ते पब्लिश केले आणि मित्रांमध्ये शेअर केले, त्यातल्या काही जणांनी तेव्हा पाहिले, आणि मला वाटलं विषय संपला. 

पण आजही कुठून तरी दोन्ही ठिकाणचे तिथले स्थानिक लोकसुद्धा अधून मधुन या व्हिडीओज पर्यंत पोहोचतात आणि त्यांना ते आवडले अशा कमेंट करतात. 

आज मला एका इस्रायली महिलेची कमेंट मिळाली. ती महिला महाराष्ट्रात जन्मली, सहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकली आणि ५५ वर्षांपूर्वी तिकडे कुटुंबासोबत स्थलांतरित झाली. 




महाराष्ट्रात पूर्वी अनेक ज्यु शेकडो वर्ष राहिले आणि इथे छान मिसळले होते. इस्राएल राष्ट्र बनल्यावर अनेक जण तिथे स्थलांतरित झाले, पण त्यांनी मराठीशी आजही नातं जपलंय. 

माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा एका व्यक्तीशी माझा संपर्क झाला, त्यांनी इस्राएलबद्दलचा माझा मराठी व्हिडीओ  पाहिला आणि मला मराठीत कमेंट दिली. फार आनंद झाला. 

स्बस्क्रायबर नाहीत, व्ह्यूज नाहीत म्हणुन मी व्हिडीओ बनवलाच नसता तर सांगा हा आनंद मिळाला असता का? 

त्यामुळे तुम्हाला हे करिअर करायचं असेल तर वाट्टेल ती धडपड करा आणि लक्ष्य गाठा. पण तितका वेळ, संधी, सपोर्ट सर्वांकडे असेलच असं नाही. तुम्हाला यातुन आनंद मिळत असेल तर जमेल तसं करत रहा. 

तुम्ही फक्त बनवायचा आनंद घेत राहा. कोणीही वाट चुकुन तुमच्या कन्टेन्टपर्यंत येऊ शकतं. असा आनंद कधीही तुमच्या वाट्याला येऊ शकतो. 

क्रिएट, पब्लिश अँड फरगेट

ता. क. माझा तो व्हिडीओ ज्यावरून हा विषय सुरु झाला: 



4 comments:

  1. Well written as usual Akash.. just that, i feel .. संगीत सुद्धा संवादच आसतो. No different from the arts you mentioned. It could be dialogue with your own self, but it is also an art that seeks to get feedback from the audience. No doubt..it brings in happiness even when no one is around.. but every time an artist writes a poem, content, a story.. that too brings in inner happiness.. so.. music is in the same bucket as all other arts (my two penny worth of thought).. no need to classify it as संगीत and इतर कला ☺️😊

    ReplyDelete
    Replies
    1. हो, संगीत स्वतःसाठी आणि मैफिलीत श्रोत्यांसाठी असं दोन्ही सादर करता येतं. 
      मी संगीताचा वेगळा उल्लेख यासाठी केला कि समजा तुम्ही एखादं आवडतं गाणं वाजवायचा किंवा गाण्याचा सराव केला, तर तेच तुम्ही लोकांसमोर सादर करू शकता आणि आपला स्वतःचा मुड असताना सुद्धा गाऊ किंवा वाजवु शकता. 
      लेखन आणि असा संगीतापेक्षा वेगळा कन्टेन्ट जो असतो, तो आपण एकटे बसुन बनवतो, पण बनवुन झाला कि तो आपल्या प्लॅटफॉर्मवर पब्लिश करून सोडून द्यावा लागतो. तोच सेम कन्टेन्ट आपण पुन्हा पुन्हा बनवायला घेत नाही. 
      फार कमी वेळा आपण आपलं लिखाण पुन्हा वाचायला घेतो किंवा आपला व्हिडीओ बघायला घेतो. आपणच बनवलं असल्यामुळे आपल्याला माहित असतं त्यात काय आहे.
      संगीतात तेच गाणं तोच राग पुन्हा पुन्हा प्रयत्न करून रियाज करणं अपेक्षित असतं. 
      केवळ स्वतःसाठी लिखाण म्हणजे आपली डायरी असू शकते किंवा एखादी वैयक्तिक कविता. इतर कन्टेन्ट हा मुख्यतः दुसऱ्यांसमोर मांडण्यासाठीच असतो, आणि त्यांच्या प्रतिक्रियांमधुन आपल्याला आणखी गोष्टी सुचत जातात. 
      असा फरक होता माझ्या डोक्यात. तुम्ही म्हणालात तेही आहेच. कला आहे शेवटी, सगळ्या कलांमध्ये काही गोष्टी सारख्या असतातच. पण असे बारीक सारीक फरक सुद्धा असतात. 

      Delete
    2. Waah.. got it.. why you mentioned sangeet in a different bucket ! Your power of expression is commendable indeed.. proven yet again !

      Delete
  2. This was good. I'll do the same 😊

    ReplyDelete